मोठी बातमी : महिलांसाठी नोकरीची सुवर्ण संधी ; महिला व बालविकास विभागात 18,882 पदांची भरती..,

Women and Child Department bharti 2025 : सर्वांना नमस्कार, महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 5639 अंगणवाडी सेविका आणि 13,243 अंगणवाडी मदतनीस अशा एकूण 18,882 पदांची भरती करण्यात येणार आहे. आज मंत्रालयात मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

https://twitter.com/iAditiTatkare/status/1889935424367255913

तब्बल 18,882 पदांची भरती (Anganwadi bharti 2025)

14 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठी सरळ सेवा व निवडीद्वारे 374 पदांची भरती केली जाणार आहे. एकूण 18,882 पदांची भरती करण्यात येणार आहे. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक राहावी, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

राज्यात एकूण 553 बाल विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत 1,10,591 अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत. या भरतीसह राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बालकल्याण समिती आणि बाल न्याय मंडळातील रिक्त पदे भरली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महिला बचत गटांना प्रोत्साहन

महिला बचत गटांनी पोषण आहारासाठी आदर्श कम्युनिटी किचन सुरू करावेत, यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही मंत्री तटकरे यांनी सांगितले. अंगणवाडी आहार पुरवठ्यासाठी एका संस्थेला पाच अंगणवाड्या दिल्या जातील. तसेच भिवंडी निजामपूर महानगरपालिका क्षेत्रात लोकसंख्येच्या वाढीमुळे 102 नवीन अंगणवाड्यांची मागणी सकारात्मक दृष्टीकोनातून विचाराधीन आहे.

सुविधा वाढवण्यावर भर :-
नगरपालिकांमध्ये महिला व बालविकास विभागाचा अधिकारी नियुक्त करणे, अंगणवाड्या शाळेतील रिकाम्या वर्गखोल्यांमध्ये सुरू करणे, तसेच पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही मंत्री तटकरे यांनी दिल्या.
राज्यातील महिला व बालकांच्या कल्याणासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सरकार कटिबद्ध असून, भरती प्रक्रियेसह इतर आवश्यक सुविधा पुरवण्यावर भर दिला जाईल, असेही मंत्री तटकरे यांनी यावेळी सांगितले. 14 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठीही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. 

अर्जासोबत जोडावयाची प्रमाणपत्र (सांक्षाकित सत्य प्रती)

1. तहसिल कार्यालयाचे रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य)
2. लहान कुटूंबाचे प्रमाणपत्र
3. सक्षम प्राधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र (लागु असल्यास)
4. सक्षम प्राधिकारी यांचे विधवाचे प्रमाणपत्र (लागु असल्यास)
5. शासकिय / अनुदानित संस्थेत दाखल असलेल्या अनाथ अर्जदाराचे बाबतीत सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र (लागु असल्यास)
6. शैक्षणीक अर्हता / पात्रता प्रमाणपत्र, गुणपत्रके अर्जा सोबत जोडलेली कागदपत्रे स्वतः साक्षांकित (Self Attested) केलेली जोडणे बंधनकारक राहील.
7. अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मदतनीस यांना किमान आर्हता 12 वी (HSC) उत्तीर्ण आवश्यक आहे उमेदवार पदवी/पदव्युत्तर इत्यादी बाबतचे गुणपत्रक व प्रमाणपत्र यांच्या सत्य प्रति जोडणे
8. डी.एड. पदविका, बी.एड. पदविका असल्यास त्याचे गूणपत्रक व प्रमाणपत्रक.
9. विधवा व अनाथ सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र (लागु असल्यास)
10. उमेदवार MS-CIT उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र जोडणे.
11. अंगणवाडी सेविका/अंणवाडी मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका म्हणुन कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र. (लागु असल्यास) 
12. आधार कार्ड

नियम आणि अटी काय?

 1. सोबतच्या विहीत नमुन्यातील अर्ज व त्यातील सर्व रकाने उमेदवाराने कागदपत्राच्या आधारे स्वतः भरावेत. अपूर्ण अर्ज, अपूर्ण माहिती लिहिलेला अर्ज रद्द ठरवून निकाली काढण्यात येईल. 

2. शैक्षणिक पात्रता व भाषेचे ज्ञानः अंगणवाडी मदतनीस या पदासाठी उमेदवार किमान इयत्ता 12 वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) अशी किमान शैक्षणीक पात्रता आवश्यक राहील या मध्ये शैक्षणिक अर्हते पैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असने आवश्यक आहे. उमेदवार 12 वी पेक्षा जास्त पदवी किवा पदव्युत्तर शैक्षणिक अर्हता धारण करत आसल्यास या बाबतची गुणपत्रके, प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील. तसेच ज्या अंगणवाडी केंद्रासाठी उमेदवाराची निवड केल्या जाणार आहे अशा अंगणवाडी मध्ये 50% पेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरीक्त इतर भाषा बोलणारी असतील तर तेथील अंगणवाडी मध्ये मदतनीस यांच्या पदावर सदर भाषेचे ज्ञान असलेल्या उमेदवाराची नियुक्ती करण्यात येईल.

3. वयाची अट:-अंगणवाडी मदतनीस या पदासाठी वयोमर्यादा दि. 18/02/2025 रोजी किमान 18 व कमाल 35 वर्ष अशी राहील. तथापी विधवा उमेदवारासाठी ही वयोमर्यादा कमाल 40 वर्ष राहील.

4. वास्तव्याची (स्थानिक रहिवाशी असणे) अट : अर्जदार महिला संबधित ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव/वाडी/तांडा/वस्ती येथील स्थानिक रहिवाशी असावी.

5. लहान कुटुंब अटः अंगणवाडी मदतनीस या पदासाठी लहान कुटुबाची अट खालील प्रमाणे लागु राहील. 
    1. लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवारास जास्तीत जास्त दोन हयात अपत्ये.
    2. उमेदवारास दोन हयात अपत्ये पेक्षा अधीक अपत्य असल्यास उमेदवार पात्र ठरणार नाही.   
    3. अर्जदार महिला उमेदवारास लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जोडने आवश्यक आहे.


6. अंगणवाडी मदतनीस या पदावर अंतिम निवड झाल्यास उमेदवारास पंचायत राज संस्थांच्या जि.प.पं.स.ग्रा.पं. सदस्य असल्यास या पदाचा राजीनामा द्यावा लागेल.

7. अंगणवाडी सेविका/ अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज स्विकारणे विहित नमुन्यातील परीपूर्ण भरलेला अर्ज निश्चित केलेल्या कालावधीत कार्यालयीन वेळेत (सार्वजनिक / शासकिय सुटटीचे दिवस वगळून) स्वीकारले जातील. अर्जासोबत उमेदवाराची शैक्षणिक अर्हता व इतर आवश्यक कागदपत्रे ही स्वयं साक्षांकित किंवा सक्षम प्राधिकारी यांच्याकडून प्रमाणित किंवा साक्षांकित केलेली असणे आवश्यक राहील.

8. अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मदतनीस पद भरती संदर्भाने अंतिम निवडीपुर्वी केंद्र शासन राज्य शासनाने निवडीच्या निकषात वेळोवेळी केलेले बदल, सुधारणा उमेदवारावर बंधनकारक राहतील. पदभरती संदर्भाने समस्या निर्माण झाल्यास या वाबत शासन निर्देशानुसार अंतिम निर्णय घेण्यात येईल.

9. अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज दाखल करतेवेळी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांचा व प्रमाणपत्रांचाच विचार केला जाईल व त्या आधारेच शैक्षणिरक व इतर अर्हतेचे गुणांकन ग्राह्य धरले जाईल. त्यानुसार गुणांकन यादी तयार केली जाईल. अर्ज करण्याच्या अंतिम तारखेनंतर कोणतेही कागदपत्र स्वीकारले जाणार नाहीत व त्याचा विचार केला जाणार नाही.

10. एका पदासाठी एकच अर्ज करावा लागेल.

11. जाहीर प्रगटनातील नमुद केलेले अंगणवाडी सेविका,  अंगणवाडी मदतनीस यांचे रिक्त पदे भरण्याबाबत ऐनवेळी काही अडचणी निर्माण झाल्यास याबाबत रिक्त 
पदे भरणे अथवा भरती प्रक्रिया रद करण्याबाबतचा अधिकार बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी राखून ठेवलेला आहे. पदाची संख्या कमी किंवा अधिक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

12. अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी किंवा चुकीची आढळून आल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.

13. विधवा व अनाथ उमेदवाराबाबत सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडणे बंधकारक राहील.

14. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस हे पद निवळ मानधनी तत्वावर आसल्याने शासनाचे लागू आसलेले लाभ (वेतन, भत्ते, निवृत्तीवेतन इत्यादी) या पदास लागू राहणार नाहीत. 

15. अंगणवाडीच्या अनुभवासाठी फक्त बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.

Leave a Comment