Jilha Nyayalay Ratnagiri Bharti 2025 : मित्रांनो नमस्कार जिल्हा न्यायालयात नवीन पदाची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे या भरतीमध्ये सफाई कामगार (पूर्णवेळ) हे पद भरले जात आहे आणि यासाठी शैक्षणिक पात्रता अशिक्षित / 7वी / 10वी / 12वी पास असणे आवश्यक आहे तर भरती संदर्भातील निवड कशी केली जाणार आहे अर्ज कसे केले जाणार आहे अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे ती वाचून तुम्ही अर्ज सादर करू शकता
उमेदवारांनी त्यांचे अर्ज जाहिरातीच्या खंड ‘ड’ मध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे / प्रमाणपत्रे इत्यादीच्या छायांकीत सत्यप्रर्तीसह परिशिष्ट अ मधील नमुन्यानुसार, लिफाफ्यावर सफाई कामगार पदाकरीता अर्ज’ असे लिहून दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी पोहचतील या बेताने खालील पत्यावर फक्त नोंदणीकृत डाक पोच पत्राद्वारे (R.P.A.D.) किंवा शिघ्र डाक सेवाद्वारे (Speed Post) पाठवावेतः-
नोंदणीकृत डाक पोच पत्र (R.P.A.D.) किंवा शिघ्र डाक सेवा (Speed Post) व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातुन किंवा वरील नमूद केलेल्या दिनांका नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा तसेच लिफाफ्यावर ‘सफाई कामगार पदाकरीता अर्ज’ असे नमुद न केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच पोस्टाद्वारे झालेला विलंब विचारात घेतला जाणार नाही.
⚠️उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.
💼 भरती विभाग : जिल्हा व सत्र न्यायालय रत्नागिरी द्वारे ही भरती सुरू आहे
👮 पदाचे नाव :- सफाई कामगार (पूर्णवेळ)
📝 पद संख्या :- एकूण 01 रिक्त पदे भरण्यात येणार आहे
📑 शैक्षणिक पात्रता :- उमेदवार भारताचा नागरिक असावा. / सुदृढ शरीरयष्टी आणि सफाई कामगार पदाचे समारूप काम करण्याची योग्यता असणारा. अशिक्षित / 7वी / 10वी / 12वी किंवा इतर शैक्षणिक पात्रता
अनुभव :- उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
✍️ आवश्यक कागदपत्रे : 1) जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र एस. एस.सी. बोर्ड प्रमाणपत्र, 2) शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
📆 वयोमर्यादा :- 18 ते 43 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार
💵 अर्ज शुल्क :- फी नाही
💰 पगार :- 15,000 ते 46,600 रुपये पर्यंत मासिक वेतन
⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 15 फेब्रुवारी 2025
💻 अर्ज पद्धत :- ऑफलाईन (Offline)
📩 अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. प्रबंधक, जिल्हा न्यायालय, रत्नागिरी खारेघाट रोड, ता. जि. रत्नागिरी – 415612
💼 भरती कालावधी :- कायमस्वरूपी (Permanent)
🌍 नोकरी ठिकाण :- जिल्हा व सत्र न्यायालय रत्नागिरी
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज नमूना | येथे क्लीक करा |
जिल्हा न्यायालयात नवीन भरती कामाचे स्वरुप –
अ) निवड झालेल्या उमेदवारांची, जेथे नियुक्ती केली जाईल, तेथील न्यायालय, इमारतीची, इमारतीच्या परिसराची, निवासस्थानाची व कार्यालयांच्या प्रसाधनगृहांची नियमित स्वच्छता व साफसफाई करणे आणि निगा राखणे,
ब) न्यायालय इमारतीच्या आवारातील बागेची निगा राखणे.
क) वरील ‘अ’ आणि ‘ब’ मध्ये नमुद केलेल्या कामाव्यतिरीक्त न्यायिक अधिकारी यांच्या निर्देशानुसार आवश्यक ती सर्व कामे करणे.
ब) पात्र उमेदवाराकरीता अटी –
१. उमेदवाराचे चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी.
२. उमेदवाराला एम. पी. एस. सी. यु. पी. एस. सी. किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडींमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे प्रतिरोधीत केलेले नसावे किंवा अपात्र ठरवलेले नसावे.
३. उमेदवाराला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले नसावे किंवा त्याला/तिला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवलेले नसावे किंवा त्याच्या / तिच्या विरुद्ध फौजदारी खटला प्रलंबित नसावा.
४. न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांच्यावर कोणतीही विभागीय चौकशी प्रलंबित नसावी.
५. त्याला/तिला हयात असलेल्या पत्नी / पती ची संख्या एकापेक्षा जास्त नसावी.
६. महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम, २००५ नुसार, उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास, २८ मार्च २००५ व तद्नंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे, हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक नसावी.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज नमूना | येथे क्लीक करा |
क) जिल्हा न्यायालयात नवीन भरती निवड प्रक्रिया –
वेळेत प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करणेत येईल. अर्जाची छाननी केल्यावर पात्र ठरलेले अर्ज जास्त प्रमाणात असल्यास भरती प्रक्रिया समिती योग्य ते निकष लावून अर्हता/योग्यतेच्या आधारे सफाईकामगार पदासाठी अल्पसुची तयार करेल. अशी अल्पसूची (shortlist) तयार करण्याचे आणि निवड प्रक्रियेचे सर्व अधिकार भरती प्रक्रिया समिती यांचेकडे असणार आहेत. अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागेल.
ही भरती वाचा :- BRO MSW Bharti 2025 | भारतीय सीमा रस्ते संघटनेत 411 जागांसाठी भरती; पात्रता – 10 वी पास, इथे जाहिरात वाचून अर्ज करा..,
सूचनाः
१. अल्पसूची मधील उमेदवारांना या सर्व सेवाप्रवेश प्रक्रीयेकरीता प्रवेशपत्र (Admit Card) देणेत येईल.
२. प्रात्यक्षिक चाचणी व शारीरिक क्षमता चाचणी मध्ये अनुत्तीर्ण झालेले उमेदवार पुढील प्रक्रियेसाठी अपात्र ठरतील.
३. सेवाप्रवेश प्रक्रियेबाबतची सर्व माहिती/सूचना/बदल जिल्हा न्यायालय, रत्नागिरी चे सूचना फलकावर व https://ratnagiri.dcourts.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. त्याकरीता उमेदवाराने वेळोवेळी जिल्हा न्यायालयाचे वरील संकेतस्थळाची व सूचना फलकाची पहाणी करावी. यासंदर्भात कोणासही वैयक्तिकरित्या कळविण्यात येणार नाही.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज नमूना | येथे क्लीक करा |
ड) उमेदवारांनी अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या सत्यप्रती सादर कराव्यात.
१. जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र / एस. एस.सी. बोर्ड प्रमाणपत्र (School Leaving Certificate/Birth Certificate issued by Competent Authority / Board Certificate of SSC)
२. शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र.
३. शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पूर्वानुभव असल्यास त्या संबंधीचा संबंधित कार्यालयाचा दाखला.
४. जाहिरात प्रसिध्दी नंतरची तारीख असलेली दोन प्रतिष्ठीत व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नतेविषयीचे प्रमाणपत्र. (त्यांचा पत्ता, फोन नंबर व शिक्यासह) (परिशिष्ट ब)
५. लहान कुटुंबाबाबत व फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे किंवा फौजदारी न्यायालयाने शिक्षा ठोठावली नसल्याचे किंवा शिस्तभंगाची कार्यवाही झालेली नसल्याचे तसेच जाहिरातीत नमुद सर्व सूचना व अटी मान्य असल्याचे स्वयं घोषणापत्र (परिशिष्ट क)
६. सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला. (केवळ मागासवर्गीयांसाठी)
७. उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास, त्याच्या कार्यालयाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
१३. उमेदावालांची निवड ही प्रात्यक्षिक चाचणी, शारीरिक क्षमता चाचणी व मुलाखतीत मिळालेल्या एकुण गुपांच्या आधारे गुणवत्तेनुसार केली जाईल.
१४. उमेदवाराने अल्पसूची नंतर दिलेले प्रवेशपत्र (Admit Card) प्रत्येक परिक्षेचेवेळी सोबत बाळगामी आवश्यक आहे.
१५. प्रवेशपत्र (Admit Card) शिवाय कोणत्याही परिक्षेला/मुलाखतीला प्रवेश दिला जाणार नाही.
१६. या निवड प्रक्रियेत भरती प्रक्रिया समितीने घेतलेला निर्णय हा अंतिम असेल.