Gram Cultivation | हरभरा लागवड आणि तंत्रज्ञान

advertisement
Gram Cultivation
advertisement

Gram Cultivation Weather हवामान : हरभरा हे कडधान्याचे पिक अलिकडे फायदेशिर होत आहे. प्रामुख्याने रब्बी हंगामात येते. कोरडे आणि थंड तापमानात येते. 10 ते 15 सेंग्रे तापमान किमान व 25 ते 30 सेंमी कमाल तापमान असतांना किंवा घाटे भरताना धुके पडल्यास फार नुकसान होते. घाटे भरताना तापमान जास्त असल्यास पिकावर त्याचा परिणाम होतो.

Gram Cultivation Soil जमीन : मध्यम ते भारी खोल, भुसभुशीत, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमिन, हलकी जमीन टाळावी.
काळ्या जमीनीत मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. पानथळ, क्षारवट जमीनीत लागवड करु नये. पाणी देण्यासाठी समपातळीची जमीन योग्य.

Gram Cultivation जाती (सुधारीत वाण)

  • Gram Cultivationविकास (फुले जी 1) - जिरायत क्षेत्रासाठी योग्य टपोरे गोल दाणे,खते आणि पाण्याला प्रतिसाद देणारा हिरवा हरभरा व फुटाण्यासाठी चांगला
  • विश्वास ( फुले जी 5) - जिरायत क्षेत्रासाठी योग्य टपोरे गोल दाणे,खते आणि पाण्याला प्रतिसाद देणारा हिरवा हरभरा व फुटाण्यासाठी चांगला
  • फुले जी 12 - जिराईत तसेच बागाईतसाठी योग्य पिवळे दाणे सर्वाधिक उत्पादन क्षमता,मर रोग प्रतिकारक पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता अधिक जिराईत/बागाईत तसेच उशीरा पेरणीसाठी योग्य
  • विजय - जिराईत तसेच बागाईतसाठी योग्य पिवळे दाणे सर्वाधिक उत्पादन क्षमता,मर रोग प्रतिकारक पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता अधिक जिराईत/बागाईत तसेच उशीरा पेरणीसाठी योग्य
  • फुले जी 81-1-1 - जिराईत तसेच बागाईतसाठी योग्य पिवळे दाणे सर्वाधिक उत्पादन क्षमता, मर रोग प्रतिकारक पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता अधिक जिराईत/बागाईत तसेच उशीरा पेरणीसाठी योग्य
  • विशाल - टपोरे आकर्षक पिवळे दाणे, मर रोग प्रतिकारक प्रथिनांचे प्रमाण अधिक, बागायतीसाठी योग्य काबुली वाण,टपोरे दाणे, हळवे वाण,मर रोग प्रतिकारक
  • (फुले जी 87207) - टपोरे आकर्षक पिवळे दाणे, मर रोग प्रतिकारक प्रथिनांचे प्रमाण अधिक, बागायतीसाठी योग्य काबुली वाण,टपोरे दाणे, हळवे वाण,मर रोग प्रतिकारक
  • श्वेता (आयसीसीव्ही) - टपोरे आकर्षक पिवळे दाणे, मर रोग प्रतिकारक प्रथिनांचे प्रमाण अधिक, बागायतीसाठी योग्य काबुली वाण,टपोरे दाणे, हळवे वाण,मर रोग प्रतिकारक
  • विराट - काबुली वाण,मर रोग प्रतिकारक,अधिक उत्पादन

Gram Cultivation पेरणी :

  • पुर्व मशागत - जमीन खोल नांगरून कुळवाच्या दोन पाळ्या द्यावा. नांगरट 25 ते 30 सें.मी करावी. 20 ते 25 गाड्या शेणखत प्रती हेक्टर वापरावे. पेरणीपुर्वी 10 किलो फोरेट प्रती हेक्टरी मिसळावे. ढेकळे बारीक करावीत व काडी धसकटे वेचुन द्यावीत.जमीन सपाट करणे गरजेचे आहे जमीन सपाट नसल्यास पेरणी असमान होते व त्याचा उगवणीवर परिणाम होतो.
  • बियाणे प्रमाण व बीज प्रक्रिया - पेरणी पुर्वी बियाण्यास ट्रायकोडर्मा जैवीक बुरशीची 4 ग्रॅम प्रती किलो बियाण्यास ह्या प्रमाणे चोळावे . पी एस बी 250 ग्रॅम प्रती 10 कि बीयाण्याची पेरणी अगोदर अर्धा ते एक तास चोळावे .2 ग्रॅम बावीस्टीन किंवा थायरम 3 ग्रॅम प्रती किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. सावलीत बियाणे सुकवावे.
    • फुले जी - 11 60 ते 65 कि/हेक्टर
    • विकास , विजय - 40 ते 45 कि/हेक्टर
    • विश्वास, विशाल, श्वेता - 35 ते 40 कि/हेक्टर
  • पेरणीचे अंतर -
    • उभट वाण 30 बाय 10 सेंमी
    • पसरट वाणासाठी विजय 45 बाय 10 सेंमी
  • पेरणीची वेळ जिराईत संप्टेंबर, बागाईत 15 ऑक्टोंबर ते 15 नोव्हेंबर

पेरणीस उशीर झाल्यास तापमान कमी होऊन फांद्या,फुले,घाटे कमी त्यामुळे उत्पादनात घट येते.

Gram Cultivation Water Management पाणी व्यवस्थापन -

जिराईत क्षेत्रासाठी शक्य असल्यास फुले येऊ लागताच एक पाणी द्यावे. बागाईती जमीन ओलवुन वापस्यावर पेरणी करावी. 20 ते 25 दिवसांनी पहिले 45 ते 50 दिवसांनी दुसरे 65 ते 70 दिवसांनी तिसरे पाणी द्यावे .भारी जमीनीत 35 ते 40 दिवसांनी पहिले 65 ते 70 दिवसांनी दुसरे पाणी द्यावे.

Gram Cultivation आंतर मशागत -

21 दिवसात एक कोळपणी आणि एक खुरपणी करावी., बासालिन हे तणनाशकाचा वापर 1.5 लि प्रती 500 लि प्रती हेक्टर या प्रमाणात पेरणीनंतर पंरतु उगवणीपुर्वी करावा.

Gram Cultivation Fertilizers खते -

सेद्रिय खते जिवाणु खते

  • सेंद्रिय खते - शेणखत / कंपोस्ट 10 – 15 बैलगाडी / एकर. गांडुळ खत 250 ते 300 किलो प्रती एकर
  • जिवाणु खत - बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धक अधिक पी एस बी प्रती 10 किलो बियाण्यास पेरणी अगोदर अर्धा ते एक तास चोळावे.
  • रासायनिक खते- 25 किलो नत्र 50 किलो स्फुरद, प्रती हेक्टरी पेरणीच्या वेळी टाकावे . विजय वाणासाठी रासायनिक खतांच्या मात्रेत दिडपट वाढ केल्यास उत्पादनात चांगली वाढ दिसुन येते.

फवारणी ग्रेडचा वापर

फवारणी खत प्रकार फवारणी साठी पिकांची अवस्था खताचे प्रमाण प्रती २०० लि. पाणीसाठी
१८:१८:१८ किंवा २५:१०:१० वाढीसाठी  १ किलो
५:४०:२८ किंवा ०:५२:३४ घाटे लागताना १ किलो
७:७:४२ किंवा ०:०:५० दाणे भरताना १ किलो

दुय्यम व सुक्ष्म अन्नद्रव्ये

  • फेरस सल्फेट 10 किलो / एकर
  • मँग्नेशियम सल्फेट 10 किलो / एकर
  • झिंक सल्फेट 10 किलो / एकर

Gram Cultivation काढणी : 

घाटे वाळु लागताच पिक काढा. दोन दिवस वाळवुन मळणी करावी. साठणूकीपुर्वी –5 दिवस उन्हात वाळवावे साठणुकीपुर्वी कडूनिंबाचा पाला टाकावा