Free Urgent Pan Card Kase Kadhave 2025 :– सर्वांना नमस्कार, आता पॅन कार्ड असे डॉक्युमेंट झाले आहे. की त्याशिवाय बँक ची कामे होतच नाही. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर तुम्ही बँक अकाउंट उघडून शकत नाही. मग अशावेळी काही परिस्थितीत अर्जंट पॅन कार्ड लागत असते.
मग हे अर्जंट पॅन कार्ड कसे काढायचे. एका दिवसात पॅन कार्ड निघते का?, अर्जंट पॅन कार्ड काढण्यासाठी काय करावे लागते?, अर्जंट पॅन कार्ड मोबाईल मधून काढू शकतो का? अर्जंट पॅन कार्ड काढण्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतात? अर्जंट पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे. अशी सर्व माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे. तर चला पाहूया.
How To Apply For Urgent PAN Card in Mobile Marathi
तुम्हाला जर का अर्जंट पॅन कार्ड काढायचे असेल. तर तुम्ही आता घर बसल्या मोबाईल मधून फ्री मध्ये पॅन कार्ड काढू शकता. तर आज आपण अर्जंट पण कार्ड कसे काढावे ते पाहणार आहोत. तर तुम्ही हे पण कार्ड incometax च्या website वरून काढू शकतात. हे पण कार्ड कसे काढावे पाहूया.
पॅन कार्ड म्हणजे काय? | What is PAN Card in Marathi
Pan card Mahnje Kay – पॅन कार्ड काढण्यापूर्वी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे पॅन कार्ड म्हणजे काय?. कारण त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. पॅन कार्ड एक अद्वितीय ओळखपत्र आहे त्याला पर्मनंट अकाउंट नंबर (permanent account number) म्हटले जात असते याच्यात एकूण 10 अंक अल्फान्यूमरिक असतात. या दहा अंकांपैकी पाचवे अक्षर आपल्या आडनावाचे असते. पॅन कार्ड हे आयकर विभागाचे असून नागरिकांच्या वेगवेगळ्या व्यवहारांची खातरजमा ठेवणे याचे काम आहे. पॅन कार्ड आता बँक खाते उघडण्यासाठी लागते तुम्हाला जर लोन घ्यायचे असेल तेव्हाही याची आवश्यकता पडते. तर तुम्हाला समजलेच असेल पॅन कार्ड म्हणजे काय.
अर्जंट पॅन कार्ड काढण्यासाठी लागणारे आवश्यक डॉक्युमेंट | Required Document List For Urgent Pan card in Marathi?
Urgent Pan card Document List – तुम्हाला जर का अर्जंट पॅन कार्ड काढायचे असेल. तर सर्वात महत्त्वाचं आहे आधार कार्ड. फक्त आधार कार्डचा वापर करून तुम्ही अर्जंट पॅन कार्ड काढू शकता. पण याच्यासाठी तुमचे आधार कार्ड अपडेट असणे गरजेचे आहे. आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असावा. आधार कार्ड वरची जन्मतारीख पूर्ण असावी. तर तुम्ही फक्त आधार कार्डच्या मदतीने अर्जंट पॅन कार्ड काढू शकता.
अर्जंट पॅन कार्ड किती दिवसांनी मिळते? | How Many Days Required For Urgent Pan Card?
Arjant Pan Card – अर्जंट पॅन कार्ड हे फक्त 5 ते 10 मिनिटात निघत असते. परंतु वेबसाईट वरती खूप लोड असल्यामुळे याला जास्तीत जास्त 2 दिवस लागू शकतात. जर का वेबसाईट वरती लोड नसला वेबसाईट व्यवस्थित चालत असल्यास तुम्हाला पॅन कार्ड फक्त पाच ते दहा मिनिटात मिळते. जर तुम्हाला पॅन कार्ड पाच मिनिटात मिळाले नाही. अशा परिस्थितीत स्टेटस चेक करत राहायचे. त्यानंतर एक ते दोन दिवसात तुमचे पॅन कार्ड तयार होते. परंतु साधारणपणे फक्त पाच ते दहा मिनिटे लागतात जर वेबसाईट सुरळीत चालत असेल.
अर्जंट पॅन कार्ड कसे काढायचे | How to Apply For Urgent Pan Card?
Urgent Pan Card Kase Kadhayache – तुम्ही तुमच्या मोबाईल मधून अर्जंट पॅन कार्ड फक्त पाच मिनिटात काढू शकता याच्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला अर्जंट पॅन कार्ड काढण्याचा पर्याय दिसेल. त्याच्यावर क्लिक करून तुमची माहिती भरून फार्म व्यवस्थितपणे भरल्यानंतर पुढच्या पाच ते दहा मिनिटात तुम्हाला पॅन कार्ड मिळेल. परंतु ही प्रोसेस तुम्हाला लेख स्वरूपात पूर्ण सांगण्यापेक्षा तुमच्यासाठी खाली व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात आला आहे. खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून अर्जंट पॅन कार्ड मोबाईल मधून कसे काढायचे ते पहा.
1 अर्जंट पॅन कार्ड काढण्यासाठी incometax.gov.in या वेबसाईट ला भेट द्या.
2. आता “Instant E-PAN” या ऑप्शन वरती क्लिक करा.
3. त्यानंतर Get New e-PAN या ऑप्शन वरती क्लिक करा.
4. आता बॉक्स मध्ये तुमचा आधार नंबर टाका आणि Continue या बटनावर क्लिक करा.
5. त्यानंतर आधार नंबर वरती लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती OTP येईल तो टाका submit करा.
6. मग बस झाल तुमचं काम, आता PAN Card Download करण्यासाठी काही तासांनी परत वेबसाईट वरती या.
7. येथे Check Status/Download PAN या ऑप्शन वरती क्लिक करा. आणि तुमचा आधार नंबर टाका continue या बटनावर क्लिक करा.
8. मग जर तुमचा पॅन कार्ड तयार झालं असेल तर PAN Download करण्याचा ऑप्शन असेल येथे क्लिक करा.
9. आता PDF Download होईल Password विचारला जाईल Password तुमची DOB राहील ती टाका.
10 आणि बस झाल तुमचं पॅन कार्ड तयार तेही फ्री मध्ये.
📢 फ्री पॅन कार्ड कसे काढावे – व्हिडिओ पहा
अर्जंट पॅन कार्ड पोस्टाने घरी येते का? | Urgent Pan Card Postane Yete Ka?
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरून काढण्यात आलेले. Urgent Pan Card Physical स्वरूपात मिळत नाही हे फक्त तुम्हाला पीडीएफ स्वरूपात डिजिटल पद्धतीने मिळते. परंतु तुम्ही Physical पॅन कार्ड मागवू शकता. अर्जंट पॅन कार्ड तुम्हाला फक्त पीडीएफ मिळेल. स्मार्ट पीव्हीसी पॅन कार्ड मागवण्यासाठी वेगळी पद्धत आहे. परंतु हे सुद्धा सरकार मान्य असून याची प्रिंट काढून तुम्ही जवळ ठेवू शकता.
पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे? | How to Download Urgent Pan Card in Mobile Marathi
How to download pan card in marathi – अर्जंट पॅन कार्ड काढण्यासाठी अप्लाय केल्यानंतर. तुम्ही त्याला मोबाईल मध्येच डाउनलोड करू शकता त्याच्यासाठी आयकर विभागाच्या वेबसाईटला भेट द्या. 👉 incometax.gov.in
1. Instant E-PAN या पर्यायावर क्लिक करा.
2. येथे Check Status/ Download PAN या पर्यायावर क्लिक करा.
3. तुमचा आधार नंबर टाका. आधार कार्ड ला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी तो टाका. सबमिट बटनावर क्लिक करा
4. येथे पॅन कार्ड डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करा.
5. तुमचे पॅन कार्ड मोबाईल मध्ये डाऊनलोड होईल. त्याला पासवर्ड असेल तुमची जन्मतारीख हा त्याचा पासवर्ड आहे. अशा पद्धतीने तुम्ही अर्जंट पॅन कार्ड मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकता.
FAQ : Urgent Pan Card Kase Kadhayache Mobile Madhun in Marathi
Q: Urgent Pan Card Fees in Marathi?
Ans: अर्जंट पॅन कार्ड काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी लागत नाही. तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाईटवरून फ्री मध्ये अर्जंट पॅन कार्ड काढू शकता.
Q: How can I get urgent Pan Card in marathi?
Ans: तुम्ही तुमचा अर्जंट पॅन कार्ड इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या instant Pan facility चा वापर करून तयार करू शकता.
Q: How can I get PAN card in 5 Minutes in marathi?
Ans: इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाईटवरून Instant Pan Card Facility वापरून तुम्ही फक्त पाच मिनिटात अर्जंट पॅन कार्ड काढू शकता.
Q: Instant Pan Card Official Website link?
Ans: अर्जंट पॅन कार्ड काढण्याची अधिकृत वेबसाईट https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/instant-e-pan ही आहे.
Q: How to Apply For Pan card in Marathi?
Ans: तुम्हाला जर पॅन कार्ड काढायचे असेल आणि ते पोस्टाने पण घरी यायला पाहिजे त्याला आपण फिजिकल पॅनकार्ड म्हणतो असं असेल तर 👉 येथे क्लिक करा.
Q: How to Apply for Minor Pan Card in Marathi
Ans: 18 वर्षापेक्षा कमी वय असलेले मुल यांचे पॅन कार्ड तुम्ही घरबसल्या मोबाईल मधून काढू शकता त्याच्यासाठी खालील माहिती वाचा
लहान मुलाचे पॅन कार्ड काढण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात ? (documents required for minor pan card)
1. मुलाचे आधार कार्ड
2. जन्म दाखला ( आधार कार्ड वरती जन्मतारीख पूर्ण असेल तर आवश्यकता नाही)
3. वडीलांचे आधार कार्ड
4. दोन पासपोर्ट साईज फोटो
5. मोबाईल नंबर, ईमेल आयडी
18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलाचे पॅन कार्ड असे काढा ? ( Child Pancard, Minor Pan Card, Below 18 Pancard)
लहान मुलांचे पॅन कार्ड कसे काढायचे त्याची सविस्तर माहिती स्टेप-बाय-स्टेप खाली दिलेली आहे. त्याच्या साठी खाली दिलेली माहिती व्यवस्थितपणे वाचा.
- सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये खालील दिलेली वेबसाईट उघडावी लागेल.
https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html
- वेबसाईट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल त्याच्यात दिलेली माहिती भरा जसे की
- Application Type मध्ये New Pan Indian Citizen (Form 49A) सिलेक्ट करा.
- Category मध्ये Individual सिलेक्ट करा.
- तुमच्या Gender नुसार Title निवडा
- तुमचे Last Name, First Name, Middle Name टाका.
- तुमची जन्मतारीख मोबाईल नंबर ईमेल आयडी टाका.
- खाली एका ठिकाणी कुमार करायला सांगितले जाईल तिथे टिक मार करा त्याचा कोड व्यवस्थितपणे टाका आणि Submit बटनावर क्लिक करा.
- एवढे सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला टोकन नंबर मिळेल त्याचा स्क्रीन शॉट काढा किंवा एका वहीवर लिहून घ्या. त्यानंतर कंटिन्यू बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या समोर परत एक नवीन फॉर्म ओपन होईल.
- त्याच्या तुम्हाला Forword Document Physically हा पर्याय निवडायचा.
- तुम्हाला तिथे तुमच्या आधार कार्ड चे शेवटचे चार अंक टाकायला विचारले जाईल. त्याचबरोबर तुमच्या आधार कार्ड वरती तुमचे नाव जसे असेल तसे तसे टाका.
- त्यानंतर तुमचे जेंडर निवडावे लागेल.
- त्यानंतर तुमच्या वडिलांचे नाव टाकावे लागेल. वडिलांचे नाव टाकल्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचे.
- परत तुमच्या सोबत दुसरे पेज उघडेल तिथे तुम्हाला तुमचा पत्ता टाकावा लागेल त्याच्यासाठी तुम्हाला दोन पर्याय देण्यात येतील ऑफिशियल ऍड्रेस आणि रेसिडेन्सी ऍड्रेस तर तुम्ही रेसिडेन्सी ऍड्रेस हा पर्याय निवडायचा.
- त्यानंतर फक्त रेसिडेन्सी ड्रेसच्या पर्या खाली तुमचा पत्ता न चुकता व्यवस्थितपणे टाका.
- त्यानंतर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एक पर्याय असेल तिथे Yes या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या वडिलांची माहिती टाका. जसे की नाव पत्ता जन्मतारीख अशी सर्व माहिती टाकल्यानंतर Next बटणावर क्लिक करा.
- परत तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल तिथे तुम्हाला एक कोड निवडावा लागत असतो. सर्वात आधी तुमचे राज्य निवडा तुमचा जिल्हा निवडा त्यानंतर खाली तुम्हाला नवीन पर्याय येतील त्याच्यातून परत तुमचा जिल्हा निवडायचा आणि Next बटणावर क्लिक करायचे.
- त्यानंतर परत तुमच्या समोर शेवटचे पेज ओपन होईल तिथे तुम्हाला डॉक्युमेंट निवडावे लागेल जसे की नावाचा पुरावा, तुमच्या ऍड्रेस साठी पुरावा, तुमच्या जन्मतारखेचा पुरावा. हे सर्व निवडल्यानंतर खाली रिप्रेझेंटेटिव्ह निवडावा लागेल प्लेस म्हणजे जागेचे नाव तिथे तुमचा तालुका किंवा जिल्ह्याचं नाव टाकू शकता.
- सर्व माहिती अचूकपणे भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करायचे. त्यानंतर फॉर्म कन्फर्म करण्यासाठी तुमच्या आधार कार्ड चे पुढचे आठ अंकात टाकायला विचारले जाईल ते आठ अंक न चुकता टाकावे लागतील. त्यानंतर फार्म एकदा चेक करून घ्या पुढे तुम्हाला फॉर्म एडीट करता येणार नाही माहिती बरोबर असेल तर खाली सबमिट बटणावर क्लिक करायचे.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला 107 रुपयाची पेमेंट करावे लागेल ती तुम्ही तुमच्या पद्धतीने ऑनलाईन करू शकता.
- पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला आधार अथेंतिकेशन करण्याचा पर्याय येईल त्याच्यावर टिकमार्क करून आधार अथेंतिकेशन करून घ्यायचे.
- आधार अथेंतिकेशन झाल्यानंतर तुमच्यासमोर जनरेट प्रिंट नावाचा पर्याय येईल त्याच्यावर क्लिक करून फॉर्म डाउनलोड करायचा. तिथे तुम्हाला पासवर्ड विचारला जाईल तुमची जन्मतारीख तेथे पासवर्ड असेल उदा : 12/12/2012 तर पासवर्ड असेल 12122012.
- फॉर्म डाउनलोड झाल्यानंतर त्याची प्रिंट काढायची त्याच्यावर दोन फोटो चिटकवायचे फोटोच्या खाली तुम्हाला तुमची सही करावी लागेल त्यानंतर फॉर्म च्या दुसऱ्या पेज वरती पण खाली बॉक्समध्ये सही करावी लागेल फॉर्म भरल्यानंतर.
- त्याच्या सोबत तुम्हाला काही कागदपत्रे जोडावी लागते फार्म भरत असताना जी कागदपत्रे तुम्ही निवडली होती नावाचा पुरावा तुमच्या एड्रेस पुरावा जन्मतारखेचा पुरावा तसेच तुमच्या वडिलांच्या आधार कार्ड चे झेरॉक्स जोडावे लागेल.
- सर्व कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर हा फॉर्म स्पीड पोस्ट ने पॅन कार्ड ऑफिस ला पाठवावा लागेल. खाली दिलेल्या पत्त्यावर ती तुम्ही हा फॉर्म पाठवायचा.
Address : Protean eGov Technologies Limited 4th floor, Sapphire Chambers, Baner Road, Baner, Pune – 411045
- भारतातील इतर दुसऱ्या राज्यातील असाल तर Address येथे पहा 👉 More Address
- फार्म पाठवल्यानंतर 15 ते 20 दिवसाच्या आत पोस्टाद्वारे तुमच्या घरी तुमचे पॅन कार्ड घेऊन जाईल.
प्रश्न : 18 वर्षापेक्षा कमी वय असलेली मुले पॅन कार्ड काढू शकता का ? (Can below 18 make Pan Card?)
उत्तर : हो, 18 वर्षापेक्षा कमी वय असलेले मुले पॅन कार्ड काढू शकतात त्याच्यासाठी वरती दिलेली माहिती वाचा तुम्ही पण पॅन कार्ड काढू शकता.
प्रश्न : लहान मुलांचे पॅन कार्ड कसे काढायचे? (How can I get minor PAN Card?)
उत्तर : ह्या आर्टिकल मध्ये वरती लहान मुलांचे पॅन कार्ड कसे काढायचे याची सर्व माहिती दिली आहे ती माहिती वाचून तुम्ही लहान मुलांचे पॅन कार्ड काढू शकतात.
प्रश्न : लहान मुलांचे पॅन कार्ड काढण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट ? (Documents Required for minor pan card?)
उत्तर : लहान मुलांचे पॅन कार्ड काढण्यासाठी खालील दिलेले डाकुमेंट ची गरज भासते.
1. आधार कार्ड
2. शाळेचा दाखला (आधार कार्ड वरती जन्मतारीख पूर्ण असेल तर गरज नाही)
3. वडीलांचे आधार कार्ड.
4. मोबाईल नंबर व ईमेल आयडी
प्रश्न : अल्पवयीन मुलाचे पॅन कार्ड काढण्यासाठी किती वय लागते ? (minor pan card age limit?)
उत्तर : लहान मुलांचे पॅन कार्ड काढण्यासाठी वय 1 वर्षापासून ते 18 वर्ष पर्यंत असणे आवश्यक आहे.
प्रश्न : लहान मुलांचे पॅन कार्ड असते का ? (Can a Minor Pan Card?)
उत्तर : हो, लहान मुलांचे पण पॅन कार्ड आता काढता येते ज्यांचे वय 1 वर्षापासून ते 18 वर्ष पर्यंत असेल अशा मुलांचे पॅन कार्ड काढता येते.
प्रश्न : मी अठरा वर्षाच्या आधी पॅन कार्ड काढू शकतो का? (Can I make PAN Card Before 18?)
उत्तर : हो, तुम्ही अठरा वर्षाच्या आधी पॅन कार्ड काढू शकतात त्याच्यासाठी वरती माहिती दिली आहे त्याचा वापर करून मोबाईल मधूनच तुम्ही अर्ज करू शकतात.
प्रश्न : लहान मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्या पॅन कार्ड नंबर मध्ये बदल होतो का? (Does PAN Number Change Form Minor To Major?)
उत्तर : नाही, लहान मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्या पॅनकार्ड नंबर मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही फक्त फोटो बदलला जाऊ शकतो जन्मतारीख बदलली जाऊ शकते तसेच नावात बदल करू शकता पण पॅन कार्ड नंबर तसाच राहतो.
प्रश्न : लहान मुलांच्या पॅन कार्ड वरती फोटो येतो का ? (minor pan card photo?)
उत्तर : नाही, लहान मुलांच्या पॅन कार्ड म्हणजेच अठरा वर्ष आतील मुलांच्या पॅन कार्ड वर फोटो येत नाही.
प्रश्न : पॅन कार्ड काढण्यासाठी मोबाईल मधून अर्ज करू शकतो का ? ( I Can Apply Pan card in mobile ?)
उत्तर : हो, तुम्ही मोबाईल मधून पॅन कार्ड चा अर्ज भरू शकता.
प्रश्न : पॅन कार्ड काढण्याची वेबसाईट कोणती ? (NSDL Pan card official website link?)
उत्तर : ही NSDL ची official website आहे. https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html