MahaDBT| महाडीबीटी शेतकरी योजनेसाठी जाणून घ्या पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
MahaDBT शेतकरी मित्रांना विविध योजनेचा लाभ घेता यावा यासाठी महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट आहे. या मध्ये विविध शासकीय योजना, अनुदान, आणि कागदपत्रे अपलोड करता येतात या पोर्टलचे वैशिष्ठ्य म्हणजे जवळपास राज्य शासनाच्या योजना सर्व योजना एकाच जागी मिळतात आणि आणि आपण एकाच अर्जात विविध विभागाच्या विविध योजनेसाठी अर्ज करू शकतात तर आपण या लेखात विविध विभाग आणि त्यातील योजना यांचा तपशीलवार मागोवा घेणार आहोत. सर्वात आधी आपण आपल्या या वेबसाईट वर पहिल्यांदा भेट दिली असेल तर आपण आपले वेबसाईट बुकमार्क करून ठेवावी आपल्या या वेबसाईट मध्ये विविध शासकीय योजना, सरकारी नोकर भरती जाहिराती आणि शालेय/कॉलेज प्रवेशाचे अर्जाची माहिती उपलब्ध होते. हा लेख आवडल्यास शेअर करण्यास विसरू नका.
शेतकरी मित्रांना एकाच अर्जाद्वारे कृषी विभागाच्या विविध योजनांमधील सर्व बाबींना अर्ज करण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेतकरी बांधवांनी पोर्टलवरील उपलब्ध बाबींपैकी आपल्या पसंतीच्या बाबी प्रथमतः निवडाव्यात व त्यांचा अर्जात समावेश करावा. आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडून झाल्या नंतरच ‘अर्ज सादर करा’ या बटनवर क्लिक करावे. अशाप्रकारे, आपण निवडलेल्या सर्व बाबींसाठी एकच अर्ज तयार होईल व या बाबींसाठी ज्या-ज्या योजनेतून लाभ देणे शक्य असेल त्या पैकी कोणत्याही एका योजनेतून ऑनलाईन लॉटरीद्वारे लाभ देण्यात येईल. अर्ज केल्यानंतर लॉटरी प्रक्रिया होण्यापूर्वी आपण आपल्या अर्जात नवीन घटकाचा समावेश करू शकता अथवा अर्ज केलेल्या घटकापैकी एखादा घटक रद्द देखील करू शकता.
MahaDBT कृषी यांत्रिकीकरण योजना :
- कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान
- राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना
- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस
- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
- राष्ट्रीय कृषी विकास योजना - रफ्तार
MahaDBT सिंचन साधने व सुविधा :
- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना - प्रती थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन घटक)
- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस
- राष्ट्रीय कृषी विकास योजना - रफ्तार
- मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
MahaDBT फलोत्पादन :
- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
- राष्ट्रीय कृषी विकास योजना - रफ्तार
- मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
टीप : योजनेसाठी अर्ज केल्या नंतर लॉटरी पद्धतीने आपले योजना पात्र झाल्यास आपल्याला एसएमएस येतो, यासाठी चालू असणाऱ्या नं वरूनच नोंदणी करावी.
हे सुध्दा वाचा