600/- रु. प्रतिब्रास वाळू साठी रजिस्ट्रेशन सुरु | आत्ताच करा रजिस्ट्रेशन आणि मिळवा अगदी स्वस्तात वाळू...

Maharashtra Valu News

 Maharashtra Valu News | महाराष्ट्र राज्य शासनाचा मोठ निर्णय | राज्यात वाळूचे लिलाव आता बंद होणार आहेत. आता सर्वांनाच वाळू अगदी स्वस्त दारात मिळणार आहे. या निर्णयामुळे आता राज्यातील जनतेला घर बांधणे अधिक स्वस्त होणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता राज्यातील वाळूचे लिलाव बंद होणार आहेत. सर्व जिल्ह्यात लिलाव बंद करून आता वाळूची नवीन डेपो योजना सुरू करण्याचा हा मोठा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हि माहिती दिली आहे. विधानसभेत मंत्री महोदय यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाकडून आता राज्यातील वाळूचे लिलाव बंद होणार आहेत. यामुळे वाळूचा सुरू असणारा काळाबाजार आणि माफीया राज संपुष्टात येईल असा दावा शासनाचा आहे.

Maharashtra Valu News

Maharashtra Valu News 2023 शासनाचा GR वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयामुळे सध्या काळ्या बाजारात जी वाळू आठ हजार रुपये ब्रास या दराने मिळते ती वाळू मात्र 600/- रुपये ब्रास या दराने मिळणार आहे असा दावा होत आहे. यामुळे वाळूमाफियांची गुंडगिरी संपुष्टात येईल आणि राज्यातील माफिया राज मिटेल असा दावाही विखे पाटील यांनी विधानसभेत केला आहे. आता नवीन डेपो योजनेअंतर्गत राज्यातील जनतेला वाळू मिळणार असून यासाठी या डेपोचे काम राज्य शासनाकडून हाती घेण्यात येणार आहे. एकंदरीत राज्य शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील जनतेला घर बांधण्यासाठी वाळू स्वस्तात आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत वाळूमाफिया ज्या पद्धतीने सामान्य जनतेची लुबाडणूक करत होते ती लूबाडणूक यामुळे संपुष्टात येईल असा आशावाद यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

हेही वाचा : अखेर प्रतीक्षा संपली, दहावी बारावीच्या निकालाची तारीख फिक्स | या तारखेला

वास्तविक, गेल्या अनेक दिवसांपासून सरकारच्या या निर्णयाची चर्चा सुरू होती. त्याची अधिकृत घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून विधानसभेत करण्यात आली. त्यामुळेच शासनाच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्यांना लवकरच वाळू उपलब्ध होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, ते कसे काम करेल याबाबत संपूर्ण माहिती हि शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून मिळालेल्या जी.आर. मध्ये उपलब्ध आहे. मात्र लवकरच ह्या प्रक्रियेस सुरुवार होणार असून  सर्वसामान्यांना स्वस्तात वाळू कशी मिळेल, याचा संपूर्ण आराखडा शासनाच्या माध्यमातून मांडला जाणार असल्याचे बोलले जात आहे.