MPSC मध्ये महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र झाले उपलब्ध | या तारखेला होणार परीक्षा...

advertisement
MPSC Admit Card
advertisement

MPSC Admit Card | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) येत्या काही दिवसांत राज्य सेवा परीक्षा म्हणून ओळखली जाणारी नागरी सेवा परीक्षा घेणार आहे. उमेदवारांनी 2 मार्च 2023 पासून अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. नोंदणीची अंतिम तारीख 3 एप्रिल 2023 होती. गट-अ आणि गट-ब राजपत्रित पदांच्या 673 रिक्त जागा भरण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा जी प्राथमिक परीक्षा आहे ती 4 जून 2023 रोजी घेतली जाईल. परीक्षेसाठी MPSC Hall Ticket त्याच्या अधिकृत वेबसाइट @ mpsc.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

MPSC Admit Card

MPSC Admit Card डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

विषय :- महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ प्रवेश प्रमाणपत्राबाबत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, दिनांक ४ जून २०२३ रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतः च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही. कोव्हिड - १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे. आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना तसेच आयोगाच्या संकेतस्थळावरील 'Guidelines for Examination' या सदराखाली उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या वेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.

प्रवेशप्रमाणपत्र मिळविण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact- secretary@mpsc.gov.in व support online@mpsc.gov.in या ईमेल व/अथवा १८०० १२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.