बारावी वरून निघालेल्या या भरतीस अर्ज करण्याची आज आहे शेवट तारीख; आत्ताच करा अर्ज...
Mumbai Jobs बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये स्टाफ नर्स पदाच्या ६५२ जागा
✍ पद : स्टाफ नर्स
✍ पदसंख्या : एकूण ६५२ जागा
✍ वेतन श्रेणी : रु. ३५,४००-१,१२,४००/- अधिक भत्ते
✔ शैक्षणिक पात्रता : १०+२ उत्तीर्ण, जी,एन,एम कोर्स, नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणीकृत उमेदवार, संगणक ज्ञान, इ.
➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : उल्लेखित नाही.
✈ नोकरीचे ठिकाण : बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या विविध अंतर्गत रुग्णालये
⏰ ऑफलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०८ मार्च २०२३
⏰ ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २१ मार्च २०२३
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे :
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Mumbai Jobs बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये या पदाचा ऑफलाईन अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रमुख रुग्णालये, विशेष रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये व सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत प्रसूतिगृहे यांच्या आस्थापनेवरील खालील तक्त्यात नमूद केलेली "परिचारीका (Staff Nurse)" या संवर्गातील पदे भरण्यासाठी विहित अर्हता धारण करणाऱ्या व अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून दि. 08/03/2023 ते दि. 21/03/2023 या कालावधीत जाहिरातीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
निवडीचे निकष :- एकूण रिक्त पदांपैकी 90% पदे फक्त बृहन्मुंबई महानगरपालिका परिचर्या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून भरण्यासाठी निवडीचे निकष खालीलप्रमाणे:- बृहन्मुंबई महानगरपालिका परिचर्या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेली अर्हता, अटी व शर्ती धारण करीत असलेल्या उमेवारांमधून त्यांच्या परिचारीका अभ्यासक्रम जनरल नर्सिंग अँन्ड मिडवायफरी पदविका (G.N.M.) उत्तीर्ण वर्ष तसेच जनरल नर्सिंग अँन्ड मिडवायफरी पदविका (G.N.M.) अभ्यासक्रमाच्या (तीन किंवा साडेतीन वर्षाच्या) प्रत्येक वर्षाचे प्राप्त गुण लक्षात घेऊन अंतिम टक्केवारीचे परिगणन करून निवडयादी तयार करण्यात येईल. निवडीच्या निकषानुसार परिगणन करण्यात आलेली अंतिम टक्केवारी गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरण्यात येईल.
ब) एकूण रिक्त पदांपैकी 10% पदे बृहन्मुंबई महानगरपालिका परिचर्या शाळेतून व इतर मान्यताप्राप्त परिचर्या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून भरण्यासाठी निवडीचे निकष खालीलप्रमाणे:- बृहन्मुंबई महानगरपालिका परिचर्या शाळेतून व इतर मान्यताप्राप्त परिचर्या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेली अर्हता, अटी व शर्ती धारण करीत असलेला उमेदवार उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एच. एस. सी. /12 वी मध्ये प्रथम प्रयत्नात किमान 65% गुण व जनरल नर्सिंग अँन्ड मिडवायफरी पदविकेमध्ये किमान 55% गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सदर उमेदवारांची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एच. एस. सी. / 12वी) व जनरल नर्सिंग अँन्ड मिडवायफरी पदविका (G.N.M.) अभ्यासक्रमाच्या (तीन किंवा साडेतीन वर्षाच्या) प्रत्येक वर्षांच्या प्राप्त गुणांनुसार अंतिम टक्केवारीचे परिगणन करून निवडयादी तयार करण्यात येईल. या दोन्हीमध्ये प्राप्त केलेल्या अंतिम गुणांच्या टक्केवारीच्या सरासरी गुणवत्तेनुसार (by average merit) निवड यादी तयार करण्यात येईल. निवडीच्या निकषानुसार परिगणन करण्यात आलेली अंतिम टक्केवारीची सरासरी गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरण्यात येईल.
Mumbai Jobs बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये या पदाचे संपूर्ण माहितीपत्रक वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
हे सुध्दा वाचा