Post Office GDS Recruitments 2025 : भारतीय डाक विभागात 10वी पास साठी 21 हजार जागांची मेगा भरती; पगार 30,000 पर्यंत, इथे आत्ताच नोंदणी करा..,

Post Office GDS Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो! भारतीय डाक विभागाने 21413 पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली आहे. ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदासाठी इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही सुवर्णसंधी नक्कीच गमावू नका!

भारतीय डाक विभाग संपूर्ण भारतभर काम करणारी मोठी संस्था आहे. या भरतीत ब्रांच पोस्टमास्तर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्टमास्तर (ABPM) आणि डाक सेवक या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. कोणतीही लेखी परीक्षा नाही, फक्त तुमच्या 10 वी च्या गुणांच्या आधारावर मेरिट लिस्ट तयार केली जाईल.

अर्ज प्रक्रियेसाठी अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. फॉर्म भरण्यासाठी फक्त मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी आवश्यक आहे. कोणतेही शारीरिक किंवा लेखी परीक्षा नाही, त्यामुळे अर्जदारांसाठी ही एक सोपी प्रक्रिया आहे.

भारतीय डाक विभागात मेगा भरती – Post Office GDS Recruitments 2025

एकूण जागा : 21,413 जागा

पदाचे नाव व तपशील : खाली सविस्तर वाचा..,

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)21413
2GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
3डाक सेवक
एकूण जागा21413

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संगणकाचे ज्ञान  (iii) सायकलिंगचे ज्ञान

वयाची अट: 03 मार्च 2025 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही].

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मार्च 2025

अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 06 ते 08 मार्च 2025

जाहिरात (Post Office GDS Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for Post Office GDS Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे | Documents Required for Online form fill up

1) आधार कार्ड (Aadhaar Card)

2) 10 वी मार्कशिट (SSC Marksheet)

3) पासपोर्ट साइज फोटो (Passport Size Photo) (Size 50kb)

4) स्वाक्षरी (Sign) (20kb)

5) ईमेल आयडी, मोबाईल नंबर

Required Documents for Verification – उमेदवाराची निवड पोस्ट ऑफिस भरती मध्ये झाल्यावर खाली गेलेले आवश्यक कागदपत्रे डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी लागत असतात. खाली दिलेल्या सर्व कागदपत्रे ओरिजनल तसेच त्यांचे झेरॉक्स चे दोन सेट लागतात.

1) 10 वी मार्कशिट (SSC Marksheet)

2) ओळख पुरावा (Identity Proof) / आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स

3) जातीचा दाखला (Caste Certificate)

4) PWD Certificate (लागू असल्यास)

5) EWS Certificate (लागू असल्यास)

6) Transgender Certificate (लागू असल्यास)

7) Date of Birth Proof/ जन्माचा पुरावा/ शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला

8) Medical certificate issued by a Medical Officer of any Government

  • या भरती करता उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात उमेदवारांनी एकदा नक्की वाचावी.
  • उमेदवारांनी आपला अर्ज व्यवस्थितपणे भरावा, अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 मार्च 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.
  • या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पिढ्यात जाहिरात डाऊनलोड करावी.

भारतीय टपाल विभागात GDS (Gramin Dak Sevak) भरतीसाठी निवड प्रक्रिया पूर्णपणे मेरिट लिस्टवर आधारित असेल. निवड प्रक्रियेचे तपशीलवार वर्णन खालीलप्रमाणे आहे:

  1. निवड पद्धत (Selection Criteria)
    ✅ System Generated Merit List:

उमेदवारांची निवड 10वी परीक्षा गुणांच्या आधारावर तयार केलेल्या मेरिट लिस्टद्वारे केली जाईल.
गुण 4 दशांश अचूकतेसह टक्केवारीमध्ये रूपांतरित केले जातील.
✅ गुणांची गणना कशी केली जाईल?

ज्या उमेदवारांच्या मार्कशीटमध्ये फक्त गुण (Marks) दिले आहेत, त्यांचे गुण थेट घेतले जातील.
ज्या उमेदवारांच्या मार्कशीटमध्ये गुण आणि ग्रेड दोन्ही दिले आहेत, त्यांचे गुण ग्राह्य धरले जातील.
फक्त ग्रेड (Grades) असलेल्या उमेदवारांसाठी, गुण खालील तक्त्याप्रमाणे 9.5 ने गुणाकार करून ठरवले जातील:

Post Office GDS Recruitments 2025 डाक सेवक पदासाठी ऑनलाईन अर्ज :-
अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज करतांना नियम व अटी व्यवस्थित वाचून घ्यावात. वरील संकेतस्थळावर या सर्व नियम व अटी उपलब्ध आहेत.

इतर कोणत्याही माध्यमाद्वारे आलेले अर्ज व व्यक्तिश आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

अर्ज करण्यासाठी अधिसूचनेच्या परिशिष्ट पाच (V) मध्ये नमूद केलेल्या सूचनांनुसार शुल्क भरावे लागेल.

सध्या नोकरीसाठी फोन कॉल करणे किंवा नोकरीसाठी निवड झाली असल्याचे संदेश मोबाईलवर पाठविले जातात आणि यामध्ये अर्जदारांची फसवणूक होण्याची शक्यता असते.

भारतीय पोस्ट विभाग अर्जदारांना कसलेही फोन कॉल करत नाहीत. संबंधित प्राधिकरणाद्वारेच अर्जदरांशी पत्रव्यवहार केला जातो.

त्यामुळे अर्जदारांनी त्यांची वैयक्तिक माहिती किंवा नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी संबधित माहिती अनोळखी व्यक्तीस देवू नयेत आणि कोणत्याही फसव्या फोन कॉल्सपासून सावध राहावे, असे आवाहन वरिष्ठ अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग, वाशी यांनी केले आहे.

या लेखात, आम्ही भारतीय डाक विभागात 21413 जागांसाठी (Post Office GDS Bharti) मेगा भरती विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

Post Office GDS Recruitments 2025

Leave a Comment