MPSC मध्ये PSI पदाचे हॉल तिकीट उपलब्ध | या तारखेला होणार परीक्षा, लगेच करा डाउनलोड...

MPSC Hall Ticket

MPSC Hall Ticket : महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती मंडळाने आगामी पोलीस उपनिरीक्षक लिमिटेड विभागीय स्पर्धापूर्व परीक्षा २०२३ साठी परीक्षेची तारीख जाहीर केली आहे जी 2 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे. प्रवेशपत्र हे परीक्षा देणार्‍या उमेदवारांसाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे. MPSC PSI Hall Ticket 2023 : हे २४ नोव्हेंबर 2023 रोजी प्रसिद्ध झाले आहे. उमेदवार त्यांच्या ओळखपत्रासह लॉग इन करून अधिकृत MPSC वेबसाइट (mpsc.gov.in) वरून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. परीक्षेच्या उद्देशाने प्रवेशपत्र डाउनलोड करून प्रिंट करणे महत्त्वाचे आहे.

MPSC Hall Ticket : विषयः- पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ प्रवेश प्रमाणपत्राबाबत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार, दिनांक २ डिसेंबर, २०२३ रोजी नियोजित पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.

MPSC Hall Ticket

MPSC Hall Ticket : डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतः च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.

आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना तसेच आयोगाच्या संकेतस्थळावरील 'Guidelines for Examination' या सदराखाली उपलब्ध असलेल्या 'महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या वेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना' यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.

प्रवेशप्रमाणपत्र मिळविण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact- secretary@mpsc.gov.in व support-online@mpsc.gov.in या ईमेल व/अथवा १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.