Rash Driving | बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांना अजामीनपात्र गुन्ह्याच्या कक्षेत येणार ?

Rash Driving | बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांना अजामीनपात्र गुन्ह्याच्या कक्षेत येणार ? 

परवाना (Driving License) नसताना आणि दारूच्या नशेत (Drink & Drive) बेदरकारपणे Rash Driving वाहन चालवणाऱ्या सार्वजनिक वाहतूक सेवेतील चालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हे नोंदवण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दि. १५ मे २०२३ रोजी आढावा बैठक झाली. हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी असे म्हंटले आहे की, चालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांचा जीव जाऊ नये, यासाठी कठोर कायदेशीर कारवाई आवश्यक आहे.

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत पोलिस महासंचालक रजनीश सेठ, गृह विभागाचे प्रधान सचिव, अतिरिक्त पोलिस महासंचालक रवींद्र सिंघल, परिवहन आयुक्त विवेक भीमनावर आदी उपस्थित होते.

बेदरकारपणा Rash Driving आणि मद्यधुंद Dring & Drive वाहन चालवल्याने अपघातांच्या Road Accident संख्येत वाढ झाली असून त्यामुळे निष्पाप प्रवाशांचे बळी जात आहेत. २०२१ मध्ये अतिवेगामुळे (Speeding) झालेल्या अपघातांची (Accident) संख्या 20 हजार 860 असून यामध्ये 9829 जणांचा मृत्यू झाला आहे.

सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे Rash Driving वाहन चालवणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरविण्याच्या गृह विभागाच्या प्रस्तावावर बैठकीत चर्चा झाली. सार्वजनिक वाहतूक सेवा पुरविणाऱ्या वाहनांमध्ये चालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात आणि प्रवाशांचा मृत्यू झाल्यास चालकांवर कठोर कारवाई अपेक्षित आहे. त्यासाठी कायद्यात सुधारणा करायला हवी. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, परवान्याशिवाय वाहन चालवणाऱ्यांना आणि दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांना कायद्याच्या कक्षेत आणले पाहिजे.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी काय पावले उचलली आहेत, याची माहिती घेतली. 

Rash Driving | चालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागू नये - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हेही वाचा : आता स्वतः भरा आयकर सीएची गरज नाही; फक्त दोन कागदे डाउनलोड करा

Rash Driving

A review meeting was held under the chairmanship of Chief Minister Eknath Shinde today regarding the filing of non-bailable cases against drivers of public transport services who drive recklessly without a license and drink alcohol. On the lines of Himachal Pradesh, Chief Minister Shri. Shinde gave this time. The Chief Minister said on this occasion that strict legal action is necessary so that passengers do not lose their lives due to the negligence of drivers.

Director General of Police Rajnish Seth, Principal Secretary of Home Department, Additional Director General of Police Transport Ravindra Singhal, Commissioner of Transport Vivek Bhimanwar and others were present in this meeting held at Sahyadri Guest House.

Reckless and drunken driving has increased the number of accidents and thus the death of innocent passengers. In 2021, the number of accidents due to speeding is 20 thousand 860 and 9829 people died in it.

The meeting discussed the Home Department's proposal to make reckless driving on public roads a non-bailable offence. Strict action is expected to take effective action against drivers for accidents and deaths of passengers due to negligence of drivers in vehicles providing public transport services. For that, the law in this regard should be amended. On this occasion, the Chief Minister said that drivers who drive without a license and drunk drivers should be brought under its ambit.

On this occasion, the Chief Minister inquired about the ongoing measures to prevent accidents on the Mumbai-Pune Expressway, Samriddhi Highway. Chief Minister Shri. Shinde gave this time.