शासकीय वसतीगृह ऑनलाईन प्रवेश 2023-24 सुरु, आत्ताच करा अर्ज | लिंक उपलब्ध...

Hostel Admission 2023

Hostel Admission 2023 | जे विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेरगावी राहतात. अशा विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागांतर्गत आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह ऑनलाईन प्रवेश सन २०२३-२४ सुरु झालेले आहेत. विद्यार्थांना पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना किंवा वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करताना विदयार्थ्यांनी घ्यावयाची खबरदारी आणि पालकाचे घोषणापत्र आणि विद्यार्थ्यांचे घोषणापत्र नमुना इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती खाली लेखामध्ये उपलब्ध आहे.

विदयार्थ्यांनी वसतीगृह प्रवेशासाठी/पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना अर्ज ऑनलाईन https://swayam.mahaonlive.gov.in या संकेतस्थळावरुन सादर करावेत, विद्यार्थ्यांना पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना किंवा वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज करता येईल, सदर प्रवेश अभ्यासक्रम असलेल्या कालावधीसाठी ग्राह्य असेल. सादर केलेल्या योजनेत अर्ज मंजुर केला असता अभ्यासक्रम संपेपर्यंत योजना बदलता येणार नाही.

Hostel Admission 2023

Hostel Admission 2023-24 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अर्ज सादर करताना तयार केलेला लॉगिन Login id आणि Password कायमस्वरुपी लक्षात ठेवावा, त्यासाठी दैनंदिनी मध्ये लिहुन ठेवावा. लॉगिन केल्यानंतर Aadhar Authentication Status ला Click करुन आधार क्रमांक टाकावा आणि आधार लिंक करावे. Aadhar Link साठी OTP येत नसल्यास, Error येत असेल तर आधार सुविधा केंद्रातुन आपले अचुक नाव, जन्मतारीख, लिंग, फोटो आणि मोबाईल क्रमांक (शक्य असल्यास ई-मेल आय.डी.) अदयावत करुन पुनःश्च लॉगिन करुन Aadhar Authentication ला Click करून Aadhar लिंक करावे.

विद्यार्थाना पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना किंवा वसतीगृह योजना निवडल्यास प्रथम वर्षाच्या विदयार्थ्यांनी Student मध्ये New पर्याय निवडावा, जुन्या विदयार्थ्यानी (२-या आणि ३-या वर्षासाठी प्रवेश अर्ज सादर करणा-या) Renewal पर्याय निवडुन ऑनलाईन अर्ज सादर करावा.

Hostel Admission 2023 : ऑनलाईन अर्ज सादर करताना सर्व माहिती काळजीपुर्वक भरावी, भरलेली तपासुन पहावी, जसे की,

  • नावाचे स्पेलिंग, लिंग, आधार क्रमाक, जन्मतारीख, वडीलांचे/आईचे पुर्ण नाव.
  • संपुर्ण पत्ता : घर क्रमांक, घराजवळची खुण, जन्मतारीख, गाव, तालुका, जिल्हा, पिन कोड इत्यादी. मोबाईल क्रमांक (स्वत:चा आणि पालकांचा) तसेच स्वतःचा किंवा पालकांचा ई-मेल
  • आय.डी. जात प्रवर्ग आणि जात (जात दाखल्याप्रमाणे), आदिम (Primitive Tribe) असल्यास YES नसल्यास No करावे. ( महाराष्ट्रात ३ आदिम जमाती / Primitive Tribe १ . माडिया गोंड २. कोलाम. ३ कातकरी)
  • वार्षिक उत्पन्न (वर्ष २०२२-२३ तहसिलदार यांच्या उत्पन्न प्रमाणपत्राप्रमाणे), रुपये
  • २०,००० / पेक्षा कमी उत्पन्न असल्यास, बीपीएल-Yes, BPL प्रमाणपत्र क्रमांक अचुक टाकावा.
  • जात दाखला/ जात वैधता प्रमाणपत्र क्रमांक, आई वडिलांचा आधार क्रमांक (बारकोड असणारे जात प्रमाणपत्र)
  • दिव्यांगाचे प्रमाणपत्र असल्यास YES (शासकीय रुग्णालयाचे अदयावत प्रमाणपत्र आवश्यक), नसल्यास No.
  • अनाथ / Orphan असल्यास YES (महिला व बाल विकास विभागाचे प्रमाणपत्र आवश्यक), नसल्यास No.
  • महाविदयालयातील आणि अभ्यासक्रमाचे नाव, अभ्यासक्रम कालावधी, सध्याचे शिक्षण घेत असलेले वर्ष.
  • महाविदयालयातील प्रवेश ( प्रवेश पावती प्रमाणे) प्रवेश पावती क्रमांक, यापुर्वी वसतीगृहात प्रवेशित असल्यास संपुर्ण तपशिल.
  • प्रवेश हव्या असलेल्या वसतिगृहाची निवड करावी. महाविदयालय व वसतीगृह एकाच शहरात / गावात असावे.)
  • यापुर्वी प्रवेशित असलेल्या शाळा/महाविदयालयाचे नाव, अभ्यासक्रम, कालावधी आणि गुण. SSC उत्तीर्ण तपशिल : बोर्ड परिक्षेचा महिणा-वर्ष, बैठक क्रमांक.