महाराष्ट्र तलाठी भरतीच्या निकालाची अंतिम तारीख जाहीर, आणि उमेदवारांना या दिवशी मिळणार जॉईनिंग लेटर...

Talathi Result 2023

Maharashtra Talathi Result 2023 : महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी (गट-क) संवर्गाचे सरळसेवा पदभरती बाबतची जाहिरात दि. २६/०६/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. या परीक्षासाठी एकूण ८,५६,००० अर्ज प्राप्त झाले होते. महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षा दिनांक १७ ऑगस्ट २०२३ ते 14 सप्टेंबर २०२३ या कालावधीत पार पडली.

महाराष्ट्र राज्यामध्ये तलाठी मेगा भरतीचा मोठा निर्णय सरकारने घेतला होता. त्याची प्रक्रिया आता जवळपास पूर्ण होत आलेली आहे. या भरतीस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर या भरती प्रक्रियेस सुरुवात झाली. त्यानुसार राज्यातील ६ विभागीय आयुक्तांकडून जिल्हानिहाय माहिती मागवण्यात आलेली होती. आणि त्यानंतर तिथूनच महाराष्ट्र तलाठी मेगाभरतीस सुरुवात झाली.

Talathi Result 2023

हे सुद्धा वाचा : लाभार्थ्यांना मोठा दिलासा | या योजनेसाठी १ हजार ४९६ कोटी निधी वितरीत...

महाराष्ट्र तलाठी भरतीची परीक्षा ऑगस्ट २०२३ या महिन्यात घेण्यात आलेली असून, संपूर्ण परीक्षा हि यशस्वीरीत्या पार  असून विद्यार्थांना आता निकालाची ओढ लागली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण ४६४४ पदांसाठी ८ लाख ५६ हजार फॉर्म भरले होते.घेण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेची नमुना उत्तरपत्रिका जारी करण्यात आली.

Maharashtra Talathi Result 2023: Highlights

Maharashtra Talathi Bharti 2023
लेख Maharashtra Talathi Bharti Result 2023
पोस्ट लेख
रिक्त पदे 4644
परीक्षा दिनांक १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३
निकालाची तारीख १५ ऑक्टोबर २०२३
अधिकृत संकेतस्थळ  https://mahabhumi.gov.in/

टीप : अधिकृत माहितीवरून तलाठी भरती परीक्षाचा निकाल व अंतिम निकाल यादी ही १५ ऑक्टोबर २०२३ रोजी येणार आहे.

Maharashtra Talathi Result 2023 | उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • उमेदवारांची उत्तरपत्रिकेबाबत काही हरकत असेल तर अशा उमेदवारांना तक्रारीची संधी महसूल विभागाने उपलब्ध करून दिलेली आहे.
  • उमेदवारांना हरकत नोंदवण्यासाठी १०० रुपये शुल्क महसूल विभागामार्फत आकारण्यात आलेला आहे.
  • राज्यातील सर्व हरकती १६ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत जमा करण्यात याव्यात. अशी उमेदवारांना सूचना देण्यात आलेली आहे.
  • त्यामध्ये सुधारणा करण्याची अंतिम तारीख ही ३१ ऑक्टोबर २०२३ आहे.
  • सुधारणा करून अंतिम उत्तर पत्रिका ही नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जारी करण्यात येईल.
  • त्यानुसार उमेदवारांना परीक्षेत किती गुण प्राप्त झाले हे कळण्यात येईल.

उमेदवारांना राज्यपाल यांच्या हस्ते २६ जानेवारी २०२४ या रोजी नियुक्ती पत्रक वाटप होणार आहे. त्यानंतर फेब्रुवारीत उमेदवारांना नियुक्तीची ठिकाणे निश्चित केली जातील.

Maharashtra Talathi Bharti Exam Result 2023 : महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षा २०२३ चा निकाल पाहण्यासाठी फॉलो करा या सोप्या स्टेप्स...

तुमचा महाराष्ट्र तलाठी 2023 परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी, या चरणांचे अनुसरण करा :

  • महाराष्ट्र राज्य महसूल मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जा - rfd.maharashtra.gov.in
  • तलाठी भरती परीक्षा २०२३ निकालाची लिंक शोध आणि क्लिक करा. 
  • क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन पृष्ठावर पाठवले जाऊ शकते.
  • तुमचा नोंदणी क्रमांक/ हॉल तिकीट क्रमांक, जन्मतारीख (D.O.B) आणि आवश्यकतेनुसार इतर तपशील प्रविष्ट करा.
  • सबमिट बटणावर क्लिक करा, आणि तुमचा महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षा २०२३ चा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
  • तुमच्या रेकॉर्डसाठी तुमच्या निकालाची प्रत जतन करा किंवा प्रिंट काढून घ्या.

Maharashtra Talathi Bharti Exam 2023 | Cut Off Marks & Merit List :

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचे कट ऑफ गुण हे निकालासह जाहीर केले जातील. रिक्त पदांची संख्या आणि आवश्यक असलेले गुण व त्याहून अधिक मिळवलेले गुण हे उमेदवार पुढील फेरीसाठी पात्र असतील. महाराष्ट्र तलाठी परीक्षा 2023 साठी पात्र ठरलेले आणि नियुक्तीपत्रक मिळालेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या पुढील फेरीसाठी बोलावले जाईल. ज्यामध्ये वैयक्तिक मुलाखत, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश असतो.