lady finger | भेंडी लागवड हवामान, जमीन, जाती, खते व्यवस्थापन आणि पिक संरक्षण

lady finger

नमस्कार कृषक बांधवांनो, भारतातील जवळपास सर्वच राज्यात भेंडीची (lady finger) लागवड केली जाते, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये भेंडीची (lady finger) लागवड केली जाते. वर्षभर बाजारात भेंडीला (lady finger) चांगली मागणी असल्याने या पिकातून फायदेशीर उत्पन्न मिळू शकते. (lady finger) भेंडीपासून सुकी भाजी करता येते. ही भाजी पौष्टिक व पचण्याजोगी असते त्यासोबतच भेंडीचा औषधात चांगला उपयोग होतो. भेंडीमध्ये अ आणि ब जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम, फॉस्फरस यांसारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. कॅल्शियम, पोटॅशियम, सल्फर आणि लोह. तर चला आपण आज भेंडी (lady finger) लागवड आणि काळजी या बद्दल या लेखात बघणार आहोत कि हवानाम, जाती, रोग आणि काळजी कशी घ्यावी.

Lady Finger Cultivation भेंडी लावगड योग्य हवामान : खरीप व रब्बी हंगामात घेण्यात येणाऱ्या भाजीपाला वर्गातील व्यापारीदृष्ट्या तसेच आहारदृष्ट्या महत्वाचे भाजीपाला पिक. भरघोस आर्थिक लाभ देणारे पिक असल्याने महाराष्ट्रात लक्षणीय वाढ महाराष्ट्रात या पिकाखाली हजारो हेक्टर क्षेत्र आहे. या पिकासाठी लागणारे हवामानाचे निकष खालील प्रमाणे

 • उष्ण व दमट हवामानात येणारे पिक
 • २० ते ४० अंश.सेल्सियस तापमान असल्यास बीयांची उगवण व झाडांची योग्य वाढ होते व फुलगळ होत नाही.
 • १० अंश सेल्सियस पेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.
 • समशितोष्ण व भरपुर सुर्यप्रकाश असलेले हवामान उपयुक्त.

Lady Finger Cultivation भेंडी लागवड आणि लागवडीचा कालावधी : भेंडीची लागवड खरीप व उन्हाळी हंगामात करतात. खरीपासाठी बीयांची पेरणी जुन-जुलै महिन्यात तर उन्हाळी हंगामासाठी पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान करावी. लागवड सरी वरंबा किंवा सपाट वाफ्यावर करतात. खरीपात दोन ओळीतील अंतर ४५-६० व दोन रोपातील अंतर ३०-४५ सेंमी ठेवावे तर रब्बी व उन्हाळी साठी ४५x१५ किंवा ६०X२० सेमी अंतरावर पेरणी करावी. मजुराची अडचण असल्यास पांभरीने पेरणी करतात व ते उतरल्यावर ठरावीक अंतर राखुन विरळणी करावी. खरीपासाठी ८-१० किलो तर उन्हाळी लागवडीसाठी १०-१२ किलो बियाणे लागते. जमीनीच्या मगदुराप्रमाणे व हंगामानुसार ५-८ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. उन्हाळ्यात ओलावा टिकवून ठेवण्यासाठी दोन ओळीत सुके गवताचे आच्छादन करावे.

 • खरिप जून - जुलै
 • रब्बी थंडी सुरु होण्यापुर्वी
 • उन्हाळी १५ जानेवारी - फेब्रुवारी

Lady Finger Cultivation भेंडी आंतरमशागत : २ ते ३ वेळा खुरपण्या करुन झाडांना भर द्यावी. मजुराची टंचाई असल्यास बासालिन तणनाशक २-२.५ लिटर ५०० लिटर पाण्यातुन पेरणीपुर्वी फवारावे. तणनाशकाची फवारणी करताना जमीनीत पुरेसा ओलावा असावा. तणनाशकाचा फवारणीनंतर ७ दिवसांनी पेरणी करावी. फळे येण्याच्या वेळेस रोपांना मातीची भर द्यावी.

Lady Finger भेंडी साठी जमीन : भेंडी पिकाचे पोषण जमिनीच्या वरचे थरातून होत असते म्हणून मध्यम भारी ते काळी कसदार जमिन उपयुक्त, चांगला निचरा होणारी जमिन उत्तम, चोपण क्षारयुक्त व चुनखडीयुक्त जमिनीत भेंडीची लागवड टाळावी. वारंवार एकाच जमिनीत भेंडी या पिकाची लागवड करु नये. सामु ६ ते ६.८ पर्यंत व क्षारता ०.२० पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत लागवड करावी. पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत वाढ खुंटते व फुलगळ होते. हलक्या जमीनीत सेंद्रिय खतांचा वापर करावा.

Lady Finger Cultivation भेंडीच्या जाती :

 • अंकुर ४० : सरळ वाढणारी जात. पेरांमधील अंतर कमी. फळे हिरवी. हेक्टरी ८-१० टन उत्पादन.

 • महिको १० : अधिक लोकप्रिय जात. फळे गर्द हिरवी. हेक्टरी १०-१२ टन उत्पादन.

 • वर्षा : अधिक लोकप्रिय जात. लांबी ५ ते ७ सेमी फळे गर्द हिरवी व लुसलुशीत तोडल्यानंतर काळी पडत नाही. हेक्टरी १०-१२ टन उत्पादन.

 • पुसा सावनी : आय.ए.आर.आय विकसीत जात.फळे १०-१५ से.मी लांब हिरवी मुलायम झाडावर काटेरी लव देठावर तांबुस छटा फुले पिवळी व प्रत्येक पाकळीवर पिवळा ठिपका, सुरुवातीला यलो मोझाईक व्हायरस रोगास प्रतिकारक पंरतु सध्या व्हायरस रोगास बळी पडते. हेक्टरी ८-१० टन उत्पादन.

 • परभणी क्रांती : मराठवाडा कृषी विद्यापीठ विकसीत जात.फळे ७-१० से.मी लांब हिरवी पुसा सावनीपेक्षा कणखर व व्हायरस रोगास प्रतिकारक, फळे नाजुक तजेलदार हिरवी. पेरणी पासुन ५५ दिवसात पहिला तोडा सुरु होतो. उन्हाळ्यात १४-१६ तोडे तर खरीपात २० तोडे होतात. हेक्टरी ७-८ टन उत्पादन.

 • अर्का अनामिका : झाड उंच फळे लांब कोवळी हिरवी, फळांचा देठ लांब.व्हायरस रोगास प्रतिकारक. फळे काढणीस सोयीस्कर. हेक्टरी ९-१२ टन उत्पादन.

Lady Finger Cultivation भेंडी खत आणि खत व्यवस्थापन :

 • सेंद्रिय खते :
  • शेणखत / कंपोस्ट 15 – 20 बैलगाडी / एकर
  • गांडुळ खत 400 ते 500 किलो प्रती एकर
  • निंबोळी पेंड 4 गोणी लागवडीस
 • जिवाणु खते :
  • शेतात टाकणे - रोपप्रक्रिया केली नसल्यास एकरी तीन किलो अझॅटोबॅक्टर व ४ किलो फॉस्फोकल्चर एक बैलगाडी शेणखतात मिसळुन द्यावे.
 • दुय्यम व सुक्ष्म अन्नद्रव्ये :
  • दुय्यम अन्नद्रव्ये - मॅग्नेशियम सल्फेट १० कि/ एकर चिलेटेड स्वरुपातील सुक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा.
  • सुक्ष्म अन्नद्रव्ये - फेरस सल्फेट १० कि/ एकर झिंक सल्फेट ५ कि/ एकर, बोरॉन २ कि/ एकर, चिलेटेड स्वरुपातील सुक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा.
 • फवारणी ग्रेडचा वापर
फवारणी खत प्रकार फवारणी संख्या फवारणी साठी पिकांची अवस्था खताचे प्रमाण प्रती २०० लि. पाणीसाठी
२५:१०:१० किंवा १८:१८:१८ रोपांची लावणीनंतर १० दिवसाच्या फरकाने ३ फवारण्या कराव्यात १ किलो
महाबोरोझीम फुलोरा सुरु होण्यापूर्वी, पूर्ण झाल्यानंतर व फळधारणे नंतर ३५० ते ४०० ग्रॅम
५:४०:२८ किंवा १५:५:३५ आलटुन पालटुन फुलोरा सुरु होण्यापुर्वी ते फळधारणे पर्यंत १ किलो
महाकॅल्शियम फळधारणा पूर्ण झाल्यानंतर व १५ दिवसांनी १५० ते २०० ग्रॅम
७:७:१२ (महागोल्ड) फळे पिकण्यास सुरुवात होण्यापुर्वी व तोडणी कालावधीत १.५ किलो
 • रासायनिक खते
खते देण्याची वेळ नत्र किलो प्रती एकर स्फुरद किलो प्रती एकर पालाश किलो प्रती एकर
खते नत्र युरीया स्फुरद सु.फॉस्फेट पालाश म्यु ऑ पोटॅश
पूर्व लागवड ११.५ २५.० १६.० १००.० १५.० २५.०
एक महिना २३.०० ५०.०० ०.०० ०.०० ०.०० ०.००
फुलोरा ११.५ २५.०० १६.०० १००.० १५.० २५.०
फळधारणा ११.५ २५.० ८.० ५०.० १५.० २५.०

सूचना - खते माती परिक्षणानुसार द्यावीत. युरीयाचा वापर पिकाच्या परिस्थितीनुसार कमी अधिक करावा.

Lady Finger Cultivation भेंडी अन्नद्रव्य कमतरता :

 • स्फुरद कमतरता :
  • लक्षणे : झाडांची व मुळांची वाढ खुंटते. फुलगळ होते व फळे पोसली जात नाही . पाने मागील बाजूस वळतात. झाडांची पाने हिरवे व जांभळट होतात.
  • उपाय : ००:५२:३४ १.५ किलो / २०० लि पाणी, ५:४०:२८ १ किलो / २०० लि पाणी जमिनीतुन स्फुरदयुक्त खताचा पुरवठा करावा.
 • लोह कमतरता :
  • लक्षणे : पाने व देठ पिवळे दिसतात. नविनच फुटलेले पाने पिवळी पडतात. पानांमध्ये हरितद्रव्याचा अभाव दिसतो.
  • उपाय : फवारणी - फेरस सल्फेट ५ ग्रॅ / लि फेरस सल्फेट (चिलेटेड) २५ किलो प्रती हेक्टर जमिनीत द्यावे.

Lady Finger Cultivation भेंडी पिक संरक्षण रोग :

 • केवडा : हा विषाणुजन्य रोग असुन त्यास येलो व्हेन मोझॅक म्हणतात. रोगट झाडाच्या पानांच्या शिरा पिवळ्या पडतात. पानांचा इतर भाग पिवळसर हिरवा दिसतो. भेंडी लागल्यानंतर ती पिवळी दिसते. रोग नियंत्रण : रोगट झाडे काढुन नष्ट करावीत. पांढऱ्या माशीचे वेळीच नियंत्रण करावे. या साठी मिथील डिमेटॉन 2 मीली प्रती लि किंवा क्विनॉलफॉस 2 मीली यापैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी.
 • भुरी : प्रथम पानांवर पांढरे डाग पडतात. डाग नंतर पसरत जाऊन संपुर्ण पानांवर पावडर पसरल्यासारखे दिसते. दमट हवामानात हा रोग झपाट्याने पसरतो. पाने सुकुन गळुन पडतात आणि फळे लागत नाहीत. रोग नियंत्रण : ८० टक्के पाण्यात विरघळणारे सल्फर २.५ ग्रॅम प्रती लि आणी कॅराथेन ०.५ मीली प्रती लि यांची फवाराणी करावी. प्रादुर्भाव जास्त दिसु लागल्यास हेक्झाकोनॅझोल (कॉन्टाफ) ०.५ मीली प्रती लि ह्या बुरशीनाशकाची फवारणी करावी.

lady finger

Lady Finger Cultivation भेंडी पिक संरक्षण किडी :

किडी लक्षण नियंत्रण उपाय
शेंडा अळी व फळ पोखरणारी अळी लक्षणे या किडीची अळी पांढरट तपकीरी असुन डोके गर्द तपकीरी असते. शेंड्याकडुन खोडात शिरुन आतील भाग पोखरुन खातात. अळी देठाजवळ फळात शिरुन फळाचे नुकसान करते. फळे वाकडी होतात आणि त्यावर छिद्र दिसतात.
रोग नियंत्रण किडलेले शेंडे व फळे गोळा करुन नष्ट करावीत. क्लोरोपायरीफॉस 2 मीली प्रती लि व क्विनॉलफॉस 2 मीली प्रती लि फवारावे. कार्बारील 2 ग्रॅम व निंबोळी तेल 3 मीली यांची एकत्रीत फवारणी करावी. किडीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास सायपरमेथ्रिन 0.5 मीली किवा फेनव्हरलेट 0.5 मीली प्रती लि फवारावे. जमीनीवर पडलेले किडग्रस्त फुले,फळे आणि कळ्या जाळुन नष्ट करावीत.
मावा लक्षणे कोवळ्या पानांतुन रस शोषल्याने पाने पिवळेसर पडतात त्यामुळे पाने वेडीवाकडी दिसतात. व रोपांची वाढ खुंटते. किडीच्या शरीरातुन पातळ स्राव बाहेर पडतो त्यावर काळ्या बुरशींची वाढ होते. विषाणुजन्य रोगांचा प्रसार पिकांवर होतो. पानांच्या प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा येतो.
नियंत्रण लागवडीनंतर रोपांभोवती दाणेदार फोरेट 5 ग्रॅम प्रती झाड या प्रमाणात रिंग करुन टाकावे. निंबोळी तेल 3 मीली प्रती लि अधिक मोनोक्रोटोफॉस 2 मीली प्रती लि यांची फवारणी करावी. प्रादुर्भाव जास्त असल्यास अॅसीफेट 2 ग्रॅम प्रती लि किंवा कॉन्फिडॉर 0.5 मीली प्रती लि या किटकनाशकाची फवारणी करावी
पांढरी माशी लक्षणे ह्या किडीची पिल्ले व प्रौढ पानांतील रस शोषतात. झाडांची वाढ खुंटते व भेंडी लागत नाही. पाने अर्धवट पिवळे होतात. भेंडीवर केवडा रोग होतो.
नियंत्रण या कीडीसाठी मोनोक्रोटोफॉस 2 मीली प्रती लि किंवा मिथील डिमेटॉन 2 मीली प्रती लि यांपैकी एका किटनाशकाची फवारणी करावी. ह्या किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसु लागल्यास प्राईड 0.5 ग्रॅम प्रती लि फवारावे. निंबोळी तेल आलटुन पालटुन फवारावे.
लाल कोळी लक्षणे ह्या किडीची पिल्ले व प्रौढ पानांतील रस शोषतात त्यामुळे पानांमध्ये हरीतद्रव्याचा अभाव दिसतो आणि पाने मागील बाजुने लालसर होतात. ही
कीड अतिसुक्ष्म असुन पानांच्या मागील बाजुला आढळते.
नियंत्रण 80 टक्के पाण्यात विरघळणारे सल्फर 2.5 ग्रॅम प्रती लि आणी इथिऑन 3 मीली प्रती लि किंवा कॉस्केड 1 मीली प्रती लि यापैकी एका किटकनाशका ची फवाराणी करावी. अती प्रादुर्भाव दिसल्यास व्हर्टीमेक 0.5 मीली प्रती लि फवारावे ओमाईट 2 मीली प्रती लि किंवा केलथेन 1.5 मीली प्रती लि फवारावे.
तुडतडे लक्षणे ही कीड पानाच्या खाली राहुन आतील भाग कुरडतात. पाने पिवळसर होतात. झाडांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम दिसतो.
नियंत्रण लागवडीनंतर रोपांभोवती दाणेदार फोरेट 5 ग्रॅम प्रती झाड या प्रमाणात रिंग करुन टाकावे. नुवाक्रॉन 2 मीली प्रती लि किंवा मिथील डिमेटॉन 2 मीली प्रती लि यांची ठरावीक अंतराने फवारणी करावी. प्रादुर्भाव जास्त दिसु लागल्यास इमिडॅक्लोप्रीड ( कॉन्फीडॉर ) 0.5 मीली प्रती लि प्रमाणात फवारणी करावी.
हेलीकोव्हर्पा लक्षणे ही हिरव्या रंगाची घाटेअळी असुन ती फुले, कळ्या आणि फळांना उपद्रव पोहोचवीते. किडग्रस्त फुले व फळे गळुन पडतात.
नियंत्रण किडलेले शेंडे व फळे गोळा करुन नष्ट करावीत. प्रती एकरी 5 फिरोमेन सापळे लावावीत. प्रकाश सापळ्यांचा वापर किडींचे पंतग पकडण्यासाठी करावा. एच एन पी व्ही या विषाणुंची 2 मीली प्रती लि ची फवारणी करावी. डेल्टामेथ्रीन 1 मीली प्रती लि किंवा स्पार्क 2 मीली प्रती लि हे किटकनाशक फवारावे.

Lady Finger Cultivation भेंडी एकात्मिक किड नियत्रंण : एकाच जमिनीत भेंडीचे पिक सतत घेऊ नये. भेंडीचे पिक घेण्यापुर्वी पुर्वीच्या पिकांचे अवशेष नष्ट करावे. पिकाच्या वाढ अवस्थेत रासायनिक नत्र खताचा वापर कमी करुन पोषण संतुलन करावे. एखाद्या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक त्या किटकनाशकाचा कमीतकमी वापर करावा. शेंडअळीचा नियंत्रणासाठी शेंडे काढुन जाळावीत. गंध सापळे व प्रकाश सापळे यांचा वापर करावा. अंडी नियंत्रणासाठी अमावस्येनंतर 3 दिवसांनी क्युरॉक्रॉनची फवारणी करावी सुत्रकृमीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अधुन मधुन झेंडुचे आंतरपिक घ्यावे. मर रोग नियंत्रणासाठी ट्रायकोडर्माचा वापर करावा.

Lady Finger Cultivation भेंडी काढणी व उत्‍पादन : पेरणी नंतर 35 ते 45 दिवसात फुले येतात व त्यानंतर 5 ते 6 दिवसात फळे तोडणी योग्य होतात. कोवळ्या फळाची काढणी तोडा सुरु झाल्यास 2-3 दिवसांच्या अंतराने करावी. तोडणीसाठी म.फु.कृ.विद्यापीठ यांनी विकसीत केलेल्या भेंडी हार्व्हेस्टचा वापर करावा. निर्यातीसाठी 5 ते 7 सेमी लांब कोवळी एकसारखी फळाची तोडणी करावी. काढणी सकाळी लवकर करावी. काढणी नंतर शुन्य उर्जा शीत कक्षामध्ये भेंडीचे पुर्व शीतकरण करावे. खरीपातील उत्पादन हेक्टरी 10-12 टन तर उन्हाळी हंगामात 6-7 टनापर्यंत मिळते.