भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये झाला मोठा बदल | नवीन जी.आर. उपलब्ध

mahadbt

Mahadbt | माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर  यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून स्वर्गवासी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत १५ फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. याअंतर्गत आता ठिबक सिंचनाऐवजी जीवनावश्यक खतांवर अनुदान देण्यात येणार असल्याचा शासन निर्णय कृषी विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

फळबाग लागवडीअंतर्गत ठिबक सिंचन करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते, त्यामुळे ठिबक ऐवजी हे अनुदान खतांसाठी देण्याचा निर्णय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला होता. आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी 100 टक्के अनुदान देण्यात येणार असून यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती मंत्री श्री. मुंडे यांनी दिली आहे

Mahadbt | भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आता ठिबकऐवजी खतांसाठी अनुदान मिळणार – कृषी मंत्री धनंजय मुंडे

राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करतानाच गरज भासल्यास १०० कोटी रुपयांची तरतूद आणखी वाढवणार असल्याचेही मंत्री श्री.मुंडे यांनी सांगितले.

राज्य सरकारने 6 जुलै, 2018 रोजी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना राबविण्यास मान्यता दिलेली असून यामध्ये 15 फळपिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे, इत्यादी कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान देण्यात येत होते. यामध्ये आता सुधारित मापदंड लागू करण्यात आले असून मजुरीसाठी देखील वाढीव खर्च देण्यात येईल.

यापैकी ठिबक सिंचनाचे अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मिळत असल्याने, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये ठिबक सिंचनाऐवजी आता सर्व प्रकारच्या खतांसाठी 100 टक्के अनुदान दिले जाणार असून, याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

Mahadbt बद्दल नवीन शासन निर्णय : 

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये सन २०२३-२४ पासून खालीलप्रमाणे बदल करण्यास शासन मान्यता देत आहे

  • १) सन २०२३-२४ पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत 'ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे या बाबी ऐवजी 'रासायनिक व सेंद्रीय खते देणे' ही बाब समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
  • २) तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत शासन अनुदानीत बाबींच्या प्रती हेक्टरी सुधारित मापदंडांना मंजूरी देण्यात येत आहे. अधिक माहिती सोबत दिलेल्या Mahadbt जी.आर मध्ये परिशिष्ट-अ पाहावे.
  • ३) यापूढे जिवंत झाडांचे प्रमाण निश्चित केल्यानुसार प्रमाणात दिसुन आल्यास लाभार्थीना देय असणारे अनुदान तीन वर्षांत ५०:३०:२० या प्रमाणात न देता अंदाजपत्रकामध्ये (अधिक माहिती सोबत दिलेल्या Mahadbt जी.आर मध्ये परिशिष्ट-अ पाहावे.) प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षामध्ये देय दर्शविण्यात आलेल्या अनुदानाप्रमाणे देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
  • ४) उपरोक्त प्रमाणे योजनेंतर्गत केलेले बदल व सुधारित मापंदड सन २०२३-२४ पासून लागू राहतील. त्याप्रमाणे आयुक्त (कृषि) यांनी क्षेत्रीय यंत्रणेस योजनेच्या अंमलबजावणीकरिता सविस्तर सूचना निर्गमित कराव्यात.

Mahadbt