Soybean Cultivation | सोयाबीन लागवड हवामान, जमीन, जाती, खत व्यवस्थापन आणि पिक संरक्षण

Soybean Cultivation

नमस्कार शेतकरी बांधवांनो, जगात सोयाबीन Soybean Cultivation वंडर बीन्स म्हणून ओळखले जाते. हे द्विदल पीक म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेली अनमोल देणगी आहे. सोयाबीन हे खरीप हंगामातील तेलबिया आणि कडधान्यांचे महत्त्वाचे पीक आहे. या पिकामध्ये कृषी क्षेत्राची आर्थिक स्थिती तसेच खाद्यतेलाच्या दृष्टीने अर्थव्यवस्था सुधारण्याची क्षमता आहे. या पिकाच्या उत्पादकतेचा अभ्यास केला असता, महाराष्ट्र तसेच विधर्भ मध्ये उत्पादकतेच्या बाबतीत मागे आहे. नैसर्गिक कारणांव्यतिरिक्त, प्रगत कृषी तंत्राचा अभाव हे देखील उत्पादकतेत घट होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे.

Soybean Cultivation सोयाबीन लावगड योग्य हवामान : सोयाबीन हे एक तेलबीयावर्गीय तसेच आहारदृष्ट्या महत्वाचे पिक. जगातील तेलबिया उत्पादनापैंकी ५२ टक्के वाटा या पिकाचा आहे. भारतीय शेतीत हे पिक अजुन नविनच आहे. मुख्यतः खरीप पिक उष्ण तापमानास संवेदनशिल, स्वच्छ सुर्यप्रकाश वाढीस योग्य, २० ते २५ डि.से. तापमानात पिकाची उत्तम वाढ. उगवणीसाठी ३० डि.से. तापमान योग्य. उन्हाळी हंगामासाठी वाणाची निवड महत्वाची. ५०० ते ८०० ते मी.मी पाऊस योग्य. अधुन मधुन ऊन व पाऊस असणे योग्य. पेरणीनंतर जोरदार पाऊस अयोग्य. सुर्य प्रकाशाच्या कालावधीचा पिकावर परिणाम होतो.

Soybean Cultivation सोयाबीन साठी जमीन : मध्यम ते भारी लालसर गाळाची किंवा पोयट्याची जमीन योग्य. सामु ६.५ ते ७.५ पर्यंत व क्षारता ०.२० पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत लागवड करावी. सामू ८.५ पेक्षा जास्त असल्यास पिकाला बोरॉन कमी मिळतो व उत्पन्न कमी मिळते. पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत वाढ खुंटते व फुलगळ होते. जमीनीत पाणी साचुन राहणे अयोग्य. १ टक्का उतार असलेली जमीन उत्तम. चोपण क्षारयुक्त व आम्लयुक्त जमिनीत सोयाबीनची लागवड टाळावी.

Soybean Cultivation सोयाबीन मशागत आणि बीज प्रक्रिया :

 • पुर्व मशागत : जमीन खोल नांगरून कुळवाच्या दोन पाळ्या द्यावा. २० ते २५ गाड्या शेणखत प्रती हेक्टर वापरावे. पेरणीपुर्वी १० किलो फोरेट प्रती हेक्टरी मिसळावे. ढेकळे बारीक करावीत व काडी धसकटे वेचुन द्यावीत.जमीन सपाट करणे गरजेचे आहे जमीन सपाट नसल्यास पेरणी असमान होते व त्याचा उगवणीवर परिणाम होतो.
 • बीज प्रक्रिया : पेरणी पुर्वी बिंयास ३ ग्रॅम थायरम किंवा २.५ ग्रॅम कार्बेन्डेंझिम या प्रमाणे चोळावे. पेरणी पुर्वी १० कि बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबियम जिवाणू खत चोळावे त्यामुळे नत्र स्थिरीकरण होते. सोयाबीनसाठी लागणारे जमीनीतील जिवाणू वाढीसाठी रायझोबियमची प्रक्रिया गरजेची आहे. बियाण्याचे बुरशीजन्य रोगापासुन संरक्षण करण्यासाठी आणि उगवण चांगली होण्यासाठी बावीस्टीन ३ ग्रॅम या प्रवाणात वापरुन प्रक्रिया करावी. पेरणी थंड किंवा ओलसर जमीनीत करावयाची असल्यास अशा वेळी बीज प्रक्रिया करणे फायदेशीर असते.

Soybean Cultivation सोयाबीन मशागत आणि पेरणीचा कालावधी :

 • १० जुन ते १५ जुलै १५ जुलै नंतर पेरणीस उत्पादनात घट.
 • उन्हाळी हंगामातील पेरणी २५ जाने ते २५ फेब्रुवारी
  • बियाणेचे प्रमाण: ३० किलो प्रती एकर
  • पेरणी अंतर: ३० ते ४५ सेमी
  • पेरणी खोली : २ ते ३ सेमी खोल.

Soybean Cultivation

Soybean Cultivation सोयाबीनच्या जाती :

योग्य वाणाची निवड करणे महत्वाचे. जमीनीची प्रत पाहुन जातीची निवड करावी. तसेच हंगाम लक्षात घेऊन वाणाची निवड करावी.

 • एम.ए.सी.एस १२४ : ९० ते १०० दिवसात तयार होते. उंच वाढणारी जात व फुले उशीरा येतात. मुख्य खोडावर तसेच फांदीस शेंगा लागतात. रोग व किड प्रतिकारक जात. शेंगा न फुटणा­या व दाणे पिवळसर. उत्पन्न ४० ते ४५ क्विंटल
 • एम.ए.सी.एस ४५० : ब्रँक व एम.ए.सीएस १११ या जातीचा संकर. ९० ते १०० दिवसात तयार होते. मध्यम उंचीची जात. मुख्य खोडावर तसेच फांदीस शेंगा लागतात. तांबेरा रोगास प्रतिकारक जात. शेंगा न फुटणा­या व दाणे पिवळसर. उत्पन्न २५ ते ३५ क्विंटल
 • एम.ए.सी.एस ५८ : ९५ ते १०० दिवसात तयार होते. उंच वाढणारी जात व फुले तांबूस निळसर. मुख्य खोडावर तसेच फांदीस शेंगा लागतात. रोग व किड प्रतिकारक जात. शेंगा न फुटणा­या व दाणे पिवळसर. उत्पन्न २५ ते ३५ क्विंटल.
 • एम.ए.सी.एस १३ : ही जात हॅम्टन व ईसी ७०३४ या जातींचा संकर आहे. ९५ ते १०० दिवसात तयार होते. मध्यम उंच वाढणारी जात. रोग व किड प्रतिकारक जात. शेंगा न फुटणा­या व दाणे पिवळसर. उत्पन्न ४० ते ४५ क्विंटल.
 • एम.ए.सी.एस ५७ : ८५ ते ९० दिवसात तयार होते. मध्यम उंच वाढणारी व लवकर तयार होणारी जात. करपा व विषाणु रोग प्रतिकारक जात. उन्हाळी हंगामासाठी योग्य जात. उत्पन्न ४० ते ४५ क्विंटल
 • मोनेटा : ७५ ते ८० दिवसात तयार होते. कमी वाढणारी जात व फुले लवकर येतात. मुख्य खोडावर तसेच फांदीस शेंगा लागतात. शेंगा काढणी वेळेत करणे गरजेचे. शेंगा फुटणाची शक्यता जास्त. उत्पन्न २० ते २२ क्विंटल प्रति हेक्टर.

Soybean Cultivation सोयाबीन खत आणि खत व्यवस्थापन :

 • सेंद्रिय खते :
  • शेणखत / कंपोस्ट १० - १५ बैलगाडी / एकर
  • गांडुळ खत २५० ते ३०० किलो प्रती एकर
 • जिवाणु खते :
  • बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबियम जिवाणू खत अधिक २५० ग्रॅम पी.एस.बी प्रती १० बियाण्यास पेरणी अगोदर अर्धा ते एक तास चोळावे.
 • फवारणी ग्रेडचा वापर
फवारणी खत प्रकार फवारणी साठी पिकांची अवस्था खताचे प्रमाण प्रती २०० लि. पाणीसाठी
२५:१०:१० किंवा १८:१८:१८ २५-३० दिवसांनी १ किलो
५:४०:२८ किंवा ०:५२:३४ फुलोरा असताना १ किलो
७:७:४२ किंवा ०:०:५० दाणे भरताना १ किलो
 • रासायनिक खते : २० किलो नत्र ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाश प्रती एकर पेरणीच्या वेळेस वापरावे. १० किलो गंधक अधिक १० किलो सल्फेट अधिक ४ कि बोरॉक्स प्रती एकर वापरल्यास उत्पादन आणि तेलाच्या प्रमाणात वाढ. २ टक्के डी.ए.पी फवारावे पेरणी नंतर ४० व ६० दिवसांनी द्यावा. मुख्य अन्नद्रव्ये तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ययुक्त विद्राव्य खतांची फवारणी करावी.

Soybean Cultivation सोयाबीन अन्नद्रव्य कमतरता :

 • नत्र कमतरता :
  • लक्षणे : पिकाची वाढ खुंटते. झाडांची वाढ उभट व बारीक होते. पिकांची पाने पिवळी पडतात.
  • उपाय : २५: १० : १०- १.५ किलो / २०० लि पाणी १८:१८:१८- १ किलो / २०० लि पाणी जमिनीतुन नत्रयुक्त खताचा पुरवठा करावा.
 • स्फुरद कमतरता :
  • लक्षणे : झाडांची व मुळांची वाढ खुंटते. फुलगळ होते. पाने मागील बाजूस वळतात. झाडांची पाने हिरवे व जांभळट होतात.
  • उपाय : ०० : ५२ : ३४ - १.५ किलो / २०० लि पाणी ५ : ४० : २८ - १ किलो / २०० लि पाणी जमिनीतुन स्फुरदयुक्त खताचा पुरवठा करावा.
 • पालाश कमतरता :
  • लक्षणे : खोडे आखुड होतात व शेंडे जळतात. पानांच्या कडा तांबुस होतात. पानांवर तांबडे ठिपके दिसतात. पानांच्या वाळलेल्या कडा वरील बाजूस वळतात.
  • उपाय : ०० : ०० : ५० - १.५ किलो / २०० लि पाणी ७ : ७ : ४२ - १ किलो / २०० लि पाणी जमिनीतुन पालाशयुक्त खताचा पुरवठा करावा.
 • मॅग्नेशियम कमतरता :
  • लक्षणे : पानांना पिवळसर रंग येतो. शिरामधील भाग पिवळा पडतो. पानांवर हिरवट पिवळे डाग दिसतात. पानांमधील भाग पिवळा पडतो शिरा हिरव्या राहतात.
  • उपाय फवारणी - मॅग्नेशियम सल्फेट ५ ग्रॅ / लि मॅग्नेशियम सल्फेट (चिलेटेड) १० किलो प्रती हेक्टर शेणखतातुन जमिनीत द्यावे.
 • लोह कमतरता :
  • लक्षणे : झाडांची पाने पिवळे दिसतात. नविनच फुटलेले पाने पिवळी पडतात. पानांमध्ये हरितद्रव्याचा अभाव दिसतो.
  • उपाय फवारणी - फेरस सल्फेट ५ ग्रॅ / लि फेरस सल्फेट (चिलेटेड) २५ किलो प्रती हेक्टर जमिनीत द्यावे.
 • जस्त कमतरता :
  • लक्षणे : पानांना पिवळसर रंग येतो. शिरामधील भाग पिवळा पडतो. पानांवर हिरवट पिवळे डाग दिसतात. पानांमधील भाग पिवळा पडतो शिरा हिरव्या राहतात.
  • उपाय फवारणी - झिंक सल्फेट ५ ग्रॅ / लि झिंक सल्फेट (चिलेटेड) ५ किलो प्रती हेक्टर शेणखतातुन जमिनीत द्यावे.

Soybean Cultivation सोयाबीन पिक संरक्षण रोग :

 • पानावरील ठिपके :
  • लक्षणे : लागवडी नंतर ३५ ते ४० दिवसांनी पानांवर तपकीरी रंगाचे गोलाकार ठिपके आढळतात. हे ठिपके नंतर वाढत जाऊन पाने वाळुन गळुन पडतात.
  • नियंत्रण : डायथेन एम ४५ किंवा कॅप्टॉन २ ग्रॅम प्रती लि फवारावे. प्रादुर्भाव जास्त आढल्यास आंतर प्रवाही बुरशीनाशक किंवा बावीस्टिन २ ग्रॅम प्रती लि फवारावे.
 • तांबेरा :
  • लक्षणे : पानांवर खालच्या बाजुने बारिक लालसर ठिपके येतात. पानांवरुन हात फिरवल्यास लाल पावडर हातास लागते. थोड्या कालावधीत पाने लाल होऊन वाळतात.
  • नियंत्रण : डायथेन एम ४५ २.५ ग्रॅम प्रती लि किवा कूमान एल ४ मीली यापैंकी एका बूरशीनाशकाची फवारणी करावी. या रोगाचा प्रादुर्भाव जास्त असल्यास टिल्ट ०.५ मीली ह्या बुरशीनाशकाची फवारणी करावी.
 • शेगांवरील करपा :
  • लक्षणे : शेंगावर गर्द तपकिरी रंगाचे लांबट डाग आढळतात. शेंगा पिवळसर पडून वाळुन जातात.शेंगामध्ये दाणे न भरल्यामुळे उत्पन्नात घट येते.
  • नियंत्रण : लागवडीपुर्वी बियाण्याला कॅप्टॉन किंवा थायरम या पैकी एका बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रती किलो प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. ब्लायटॉक्स किंवा बावीस्टीन २.५ ग्रॅम प्रती लि फवारावे.

Soybean Cultivation सोयाबीन पिक संरक्षण किडी :

 • खोडमाशी :
  • लक्षणे : या किडीची माशी कोवळ्या पानांवर अंडी घालते. अंड्यातुन बाहेर पडलेली अळी पानाच्या देठाद्वारे शेंड्यामध्ये शिरते. अळी शेंड्याकडुन झाड पोखरते. शेंडा वाळुन मरतो.
  • नियंत्रण : प्रादुर्भाव दिसु लागताच मॅलाथिऑन २ मीली प्रती लि किंवा क्लोरोपायरीफॉस २ मीली प्रती लि यांची फवारणी करावी. किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळल्यास कार्बोसल्फॉन २ मीली प्रती लि किंवा क्विनॉलफॉस २ मीली प्रती लि यांची फवारणी करावी.
 • केसाळअळी : 
  • लक्षणे : या अळ्या झुपक्यांनी येऊन सोयाबिनची पाने खातात. पानांच्या फक्त शिरा शिल्लक राहतात. उत्पादनात प्रचंड घट येते.
  • नियंत्रण : स्पार्क २ मीली प्रती लि हे किटनाशक फवारावे. किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळल्यास कार्बोसल्फॉन २ मीली प्रती लि किंवा क्विनॉलफॉस २ मीली प्रती लि यांची फवारणी करावी.
 • घाटेअळी : 
  • लक्षणे : हिरव्या रंगाची अळी शेंगा पोखरुन आतील दाणे फस्त करते. त्याच प्रमाणे फुले व कळ्यांना सुध्दा हानी पोहोचविते. दाणे फस्त केल्याने उत्पादनात घट येते.
  • नियंत्रण :एनपीव्ही या विषाणूंची ४०० मीली प्रती एकर संध्याकाळी फावरणी करावी. ऐल्फिन १ ग्रॅम प्रती लि हे जैवीक किटकनाशक स्टिकर सोबत फवारावे. लागवडीनंतर १.५ महिन्याने प्रती हेक्टरी ५ फिरोमेन सापळे लावावे. किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळल्यास कार्बोसल्फॉन २ मीली प्रती लि किंवा क्विनॉलफॉस २ मीली प्रती लि यांची फवारणी करावी.
 • स्पोडोप्टेरा अळी : 
  • लक्षणे : ही अळी काळपट हिरव्या रंगाची असुन दिवसा जमीनीत लपुन बसते. रात्रीच्या वेळी सोयाबीनची पाने कुरतडुन खाते. याच प्रमाणे सोयाबीनची रोपे जमीनीपासुनच कुरतडते. शेंगावर सुध्दा ही किड हल्ला करते.
  • नियंत्रण : एनपीव्ही या विषाणूंची ४०० मीली प्रती एकर संध्याकाळी फवारणी करावी. नॉमेरिया रिलेयी ही बुरशी १ किलो प्रती एकर पिकावर फवारावी. लागवडीनंतर १.५ महिन्याने प्रती हेक्टरी ५ फिरोमेन सापळे लावावे. किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळल्यास कार्बोसल्फॉन २ मीली प्रती लि किंवा क्विनॉलफॉस २ मीली प्रती लि यांची फवारणी करावी.
 • गर्ड बिटल : 
  • लक्षणे : भुंगे सोयाबीनच्या फांद्यावर देठावर आणि खोडावर रिंग तयार करतात. यामुळे झाडाचा वरचा भाग सुकुन जातो. अळी शेंड्याकडुन खोडाकडे झाड पोखरते.यामुळे झाड सुकुन वाळुन जाते.
  • नियंत्रण : लागवडी पुर्वी जमीनीत ३ टक्के कार्बोफ्युरॉन १२ किलो प्रती एकरी टाकावे. प्रादुर्भाव दिसताच मिथील डिमेटॉन किंवा मोनोक्रोटोफॉस २ मीली प्रती लि फवारावे.