Cucumbers Cultivation | काकडी लागवड हवामान, जमीन, जाती, खते व्यवस्थापन आणि पिक संरक्षण

advertisement
Cucumbers Cultivation
advertisement

Cucumbers Cultivation काकडी हे वेलवर्गीय भाजीपाला पिकामध्ये महत्त्वाचे पीक आहे. सॅलड्स आणि भाज्यांसाठी हे पीक भारतात फार पूर्वीपासून घेतले जात आहे. या पिकाची लागवड उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात केली जाते. उन्हाळ्यात काकडीचे सेवन जास्त प्रमाणात केले जाते कारण काकडीचा स्वभाव थंड असतो. काकडीतही अनेक औषधी गुणधर्म आहेत. काकडी पचायला सोपी आणि पोटाच्या आजारांवर फायदेशीर आहे. काकडीत कडूपणा हा त्यात असलेल्या 'कुकुरबिटासिन' नावाच्या पदार्थामुळे असतो. भारतात, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये काकडीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये या पिकाची लागवड केली जाते. काकडीत ९६.३० % पाणी, २.५० % कार्बोहायड्रेटस ०.४० % प्रथिने, ०.१० % फॅट्स ०.४० % तंतुमय पदार्थ, ०.३० % खनिजे, ०.०१ % कॅल्शीयम, ०.०१ % फॉस्फरस, ०.००२ % लोह, ०.००७ % जीवनसत्व 'क' आणि १३ % उष्मांक (कॅलरी) असतात.

Cucumbers Cultivation काकडी लावगड योग्य हवामान : महाराष्ट्रात काकडी हे पिक खरीप व उन्हाळ्यात कमी अधिक प्रमाणात घेतले जाते. उन्हाळ्यात मागणी व बाजारभाव उत्तम असतो. या पिकासाठी लागणारे हवामानाचे निकष खालील प्रमाणे आहेत. या मध्ये वाणानुसार बदल अपेक्षित आहेत तसेच अधिक माहितीसाठी आपण संबंधित वाणाबद्दल अधिक माहितीसाठी आपली हि वेबसाईट बुकमार्क करून ठेवावी व लेख आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावे.

  • काकडी हे उष्ण हवामानात येणारे फळभाजी आहे.
  • उन्हाळी हंगामात जातीची निवड महत्वाची
  • काकडी पिकासाठी योग्य तापमान 18 ते 25 डि.से.
  • थंडीचा हंगाम वगळता खरीपात जुन जुलै अथवा उन्हाळ्यात जानेवारी मध्ये लागवड योग्य
  • बियाणेची उगवण क्षमता 11 डि से मध्ये मंदावते.
  • अती थंडी पिकास मारक ठरते.

Cucumbers Cultivation काकडी साठी जमीन : हलक्या रेताड जमीनीपासुन मध्यम ते भारी जमीन लागवडीस योग्य. पोयटायुक्त व भरपुर सेंद्रियखताचे प्रमाण असलेली व उत्तम निच−याची जमीन निवडावी. साधारणतः 5.5 ते 6.7 सामु असलेल्या जमीनीत पिके जोमदार वाढतात. पाणी साचुन राहणाऱ्या खळगट किंवा क्षारवट व चोपण जमीनी या पिकास मानवत नाही. जमीन हरळी व लव्हाळा या तणापासुन मुक्त असावी.

Cucumbers Cultivation काकडी लागवड : पुर्व मशागत व लागवड काकडीची उन्हाळी हंगामातील लागवड जाने - फेब्रुवारी महिन्यात तर पावसाळी लागवड जुन –जुलै महिन्यात करतात. अति पर्जन्यवृष्टी असलेल्या भागात सप्टे-ऑक्टो महिन्यात लागवड करावी. आळे पध्दतीत 1.5 बाय 1 मीटर अंतरावर आळे करुन त्यात शेणखत टाकुन मिसळावे व 2 ते 3 बीया टोकाव्यात. सरी पध्दतीत 2 ओळीतील अंतर 1.5 ते 2.5 मीटर ठेवुन रीजरच्या सहाय्याने सरी पाडावी. आणि सरीच्या दोन्ही किंवा एका बाजुला 45 ते 60 सेमी अंतरावर 2 ते 3 बीया टोकाव्यात. लागवडीनंतर विरळणी करावी. लागवडीसाठी सरासरी हेक्टरी 2 ते 2.5 किलो बियाणे वापरावे. चांगली उगवण होण्यासाठी बीया 24 तास ओल्या फडक्यात बांधुन ठेवाव्यात व लागवडीपुर्वी बावीस्टीन 2 ग्रॅम प्रती लि द्रावणात भिजवुन करावी.

  • पाणी पुरवठा : काकडी पिकाला माफक पण नियमीत पाणीपुरवठा आवश्यक असतो. लागवडीपुर्वी सऱ्या ओलवुन लागवड करावी म्हणजे उगवण चांगली होते. उन्हाळ्यात वाढीचा हवामानाचा विचार करुन 5 ते 7 दिवसात पाणी द्यावे. सरी फुटुन वेली खाली पाणी येणार नाही याची दक्षता घ्यावी. काकडी पिकांला वळण देणे आवश्यक असते.
  • आंतर मशागत : वेली पाण्याच्या पाटात वाढणार नाहीत अथवा एकामेकातच गुंतणार नाहीत याची काळजी घ्यावी. वेली दोन सऱ्यामधील मोकळ्या जागेत पसराव्यात. वेली खालचे व सऱ्यामधील गवत वेलींना इजा न होता काढावे.
  • संजीवकाचा वापर : काकडीच्या वेलीवर नर व मादी फुले स्वतंत्र येतात. नर फुले अगोदर येतात व त्यांचे प्रमाण मादी फुलापेक्षा जास्त असते. साहजीकच जादा उत्पन्न मिळण्यासाठी मादी फुलांची संख्या जास्त असावी त्या साठी संजीवकाचा वापर करता येतो. वेल उगवल्यानंतर 2 पांनावर असताना. जी.ए 10 ते 25 पीपीएम किंवा मॅलिक हायड्रॉक्साईड 100 पीपीएम किंवा एन ए ए 100 पीपीएम किंवा इथरेल 100 पीपीएम या द्रावणाच्या फवारण्या कराव्यात. पहिली फवारणी वेल दोन पानांवर येताच व दुसरी फवारणी त्यानंतर आठ दिवसांनी वेल चार पानांवर असतांना द्यावी. यामुळे मादी फुलांचे प्रमाण वाढुन फळधारणा व उत्पन्न वाढते.

हेही वाचा : MJPSKY YOJNA रु.५०,००० कर्जमाफी योजनेची तिसरी यादी उपलब्ध | आपले नाव शोधा लगेच

Cucumbers Cultivation

Cucumbers Cultivation काकडीच्या जाती :

  • हेमांगी : ही जात उन्हाळी हंगामासाठी योग्य. फळांचा आकार आकर्षक दंड गोलाकार व रंग पांढरा. फळाचे वजन सरासरी 150 ते 200 ग्रॅम फळे काढणीनंतर पिवळी पडत नसल्याने बाजारात भाव चांगला मिळतो. ही जात करपा व केवडा रोगास प्रतिकारक. काढणीस उशीर झाला तरी फळे टवटवीत. हेक्टरी उत्पादन 200 ते 250 क्विंटल
  • शुभांगी : ही जात उन्हाळी व खरीप हंगामासाठी योग्य. फळांचा रंग हिरवा व ते चवदार असतात. फळाचे वजन सरासरी 200 ते 250 ग्रॅम हेमांगीपेक्षा 23 ते 53 टक्क्याने जास्त उत्पादन मिळते. हेक्टरी उत्पादन 300 ते 325 क्विंटल
  • पुणा खिरा : ही जात उन्हाळी व खरीप हंगामासाठी योग्य. फळांचा रंग पांढरट पिवळसर असतो. फळे जुने झाल्यानंतर तांबूस तपकीरी छटा येते. फळाचे वजन सरासरी 130 ते 150 ग्रॅम हेक्टरी उत्पादन 130 ते 150 क्विंटल
  • शितल : ही जात जास्त पर्जन्यमान असलेल्या भागासाठी योग्य. फळांचा रंग हिरवा व लांबी मध्यम असते. ही जात लवकर येणारी आहे. फळे काढणीनंतर 3 ते 4 दिवस टिकतात. फळाचे वजन सरासरी 180 ते 200 ग्रॅम हेक्टरी उत्पादन 200 ते 250 क्विंटल
  • शिवनेरी : ही जात सर्वात जास्त उत्पन्न देणारी आहे. फळांचा रंग पांढरट व लांबी मध्यम असते. ही जात लवकर येणारी आहे. फळे काढणीनंतर 3 ते 4 दिवस टिकतात व रंग पिवळा पडत नाही. फळाचे वजन सरासरी 180 ते 200 ग्रॅम हेक्टरी उत्पादन 300 ते 350 क्विंटल
  • प्रिया - ही संकरीत जात असून फळे रंगाने गर्द हिरवी व सरळ असतात. हेक्‍टरी उत्‍पादन 30 ते 35 टन मिळते.
  • काकडीची जाती आणि बाजारात विविध संकरित काकडीची जात उपलब्ध आहेत योग्य वाण निवडावे.

Cucumbers Cultivation काकडी साठी उत्तम खत आणि खत व्यवस्थापन :

काकडी पिकाला त्याच्या आयुष्यात प्रती हेक्टरी 135 किलो नत्र , 60 किलो स्फुरद व 60 किलो पालाश द्यावा. निम्मे नत्र संपुर्ण स्फुरद व पालाश लागवडीपुर्वी द्यावी

  • सेंद्रिय खते :
    • शेणखत / कंपोस्ट 10 – 15 बैलगाडी / एकर
    • गांडुळ खत 300 ते 400 किलो प्रती एकर
    • निंबोळी पेंड दोन गोणी लागवडीस
  • जिवाणु खते :
    • एकरी अझॅटोबॅक्टर 3 किलो अधिक फॉस्फोकल्चर 4 किलो एक बैलगाडी शेणखतात मिसळुन द्यावे.
  • दुय्यम व सुक्ष्म अन्नद्रव्ये :
    • दुय्यम अन्नद्रव्ये - मॅग्नेशियम सल्फेट 10 कि/ एकर चिलेटेड स्वरुपातील सुक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा.
    • सुक्ष्म अन्नद्रव्ये - फेरस सल्फेट 10 कि/ एकर झिंक सल्फेट 5 कि/ एकर, बोरॉन 2 कि/ एकर, चिलेटेड स्वरुपातील सुक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा.
  • फवारणी ग्रेडचा वापर
फवारणी खत प्रकार फवारणी संख्या फवारणी साठी पिकांची अवस्था खताचे प्रमाण प्रती २०० लि. पाणीसाठी
25:10:10 किंवा 18:18:18 रोपांची उगवणीनंतर 10 दिवसांनी 1 किलो
महाबोरोझीम फुलोरा सुरु होण्यापुर्वी 350 ते 400 ग्रॅम
5:40:28 किंवा 15:5:35 आलटुन पालटुन फुलोरा सुरु होण्यापुर्वी ते फळधारणे पर्यंत 1 किलो
7:7:42 (महागोल्ड) किवा 0:0:50 फळे पिकण्यास सुरुवात होण्यापुर्वी व तोडणी कालावधीत 1.5 किलो
  • रासायनिक खते
खते देण्याची वेळ नत्र किलो प्रती एकर स्फुरद किलो प्रती एकर पालाश किलो प्रती एकर
खते नत्र युरीया स्फुरद सु.फॉस्फेट पालाश म्यु ऑ पोटॅश
लागवड ७.० १५.० १६.० १००.० १५.० २५.०
एक महिना २३.०० ५०.०० ०.०० ०.०० ०.०० ०.००
फुलोरा फळधारण १०.०० २५.०० १६.०० १००.० ३०.० ५०.०
एकूण ४०.००   ३२.००   ४५.००  

सूचना - खते माती परिक्षणानुसार द्यावीत. नत्र हप्त्या ह्प्तयाने दिल्यास फायदेशीर ठरते. युरीयाचा वापर पिकाच्या परिस्थितीनुसार कमी अधिक करावा.

Cucumbers Cultivation काकडी पिक संरक्षण किडी :

Red weevil insect

 

लाल भूंगे लाल भूंगे पिक लहान असताना पाने कुरतडुन खातात. पानांचा कोवळा भाग ही किड कुरतडुन खाते. बींयाची उगवण झाल्यानंतर प्रादुर्भाव सुरु होतो.
नियंत्रण होस्टाथिऑन 2 मीली किंवा कार्बारील 3 ग्रॅम किंवा नुवाक्रॉन 2 मीली प्रती लि प्रमाणे फवारणी करावी.
aphids

 

मावा झाडांच्या पानातुन व इतर कोवळ्या भागातुन रस शोषतो. पाने पिवळे पडतात व रोपांची वाढ खुंटते. किडीच्या शरीरातुन पातळ स्राव बाहेर पडतो त्यावर बुरशींची वाढ होते.
नियंत्रण डायमेथाईट 2 मीली प्रती लि फवारावे किंवा मिथाईल डिमेटॉन 2 मीली प्रती लि किंवा कॉन्फिडॉर 0.5 मीली प्रती लि फवारावे. निंबोळी अर्क 2 मीली प्रती लि फवारावे.
Jassid

 

तुडटुडे ही कीड पानाच्या खाली राहुन आतील भाग कुरडतात. पाने पिवळसर होतात. झाडांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम दिसतो.
नियंत्रण लागवडीनंतर रोपांभोवती दाणेदार फोरेट 5 ग्रॅम प्रती झाड या प्रमाणात रिंग करुन टाकावे. नुवाक्रॉन 2 मीली प्रती लि किंवा मिथील डिमेटॉन 2 मीली प्रती लि यांची ठरावीक अंतराने फवारणी करावी. प्रादुर्भाव जास्त दिसु लागल्यास इमिडॅक्लोप्रीड ( कॉन्फीडॉर ) 0.5 मीली प्रती लि प्रमाणात फवारणी करावी.
fruitfly
फळमाशी फळे लहान असताना फळांच्या साली खाली अंडी घालते. अळ्या फळातील गर खातात. फळे सडुन जातात
नियंत्रण मॅलाथिऑन किंवा क्विनॉलफॉस 2 मीली प्रती लि प्रमाणात फवारणी करावी. किडकी फळे नष्ट करावीत. रक्षक सापळ्यांचा वापर करावा.

Cucumbers Cultivation काकडी पिक संरक्षण रोग :

  • भुरी : या रोगामुळे पानाच्या खालच्या बाजुला पिठासारखी पांढरी बुरशी दिसते. नंतर ती पांनाच्या पृष्ठभागावर पसरते. पाने पिवळसर पडुन वाळुन जातात. पिकाची वाढ खुंटते व फळ वाढत नाही. रोग नियंत्रण : कॅराथेन 1 मीली प्रती लि किंवा बावीस्टीन 1 ग्रॅम प्रती लि प्रमाणात या बुरशीनाशकांच्या 2 ते 3 फवारण्या कराव्यात. या रोगाच्या नियंत्रणासाठी गंधक वापरु नये.
  • केवडा : पानाच्या खालच्या भागावर पिवळसर तपकीरी पडुन वाळुन जातात. पाने आणि खोड रोगाला बळी पडते. पाने वेडीवाकडी वाळुन गळुन पडतात. रोगास दमट हवामान पोषक असते व तो झपाट्याने पसरतो. रोग नियंत्रण रिडोमिल 2 ग्रॅम प्रती लि प्रमाणात फवारणी करावी. कॅप्टान किंवा कर्झट 2 ग्रॅम प्रती लि प्रमाणात फवारणी करावी.
  • करपा : पानावर लालसर करड्या रंगाचे डाग पडतात. पाने सुकतात व गळुन पडतात. हवेतील आर्द्रता वाढल्यास हा रोग झपाट्याने पसरतो. रोग नियंत्रण : बावीस्टीन 2 ग्रॅम प्रती लि प्रमाणात फवारणी करावी. स्ट्रेप्टोसायक्लीन 100 पीपीएम अधिक ब्लायटॉक्स 2.5 ग्रॅम प्रती लि प्रमाणात फवारणी करावी.

Cucumbers Cultivation काकडी काढणी व उत्‍पादन : फळे कोवळी असतानाच काढणी करावी म्‍हणजे बाजारात चांगला भाव मिळतो. काकडीची तोडणी दर दोन ते तीन दिवसांच्‍या अंतराने करावी. जाती व हंगामानुसार काकडीचे हेक्‍टरी 200 ते 300 क्विंटल पर्यंत उत्‍पादन मिळते