पोलीस पाटील भरती २०२४ | परभणी जिल्ह्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु...

Police Patil Bharti

Maharashtra Police Patil Bharti 2024 : जिल्हाधिकारी कार्यालय परभणी पोलीस पाटील भरती २०२४ जाहीर झालेली असून सदर भरतीस अर्ज प्रक्रिया हि ऑनलाईन पद्धतीने असून अर्ज करण्याची शेवट तारीख २३ जानेवारी २०२४ आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

परभणी जिल्हयातील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय परभणी अंतर्गत गाव पोलीस पाटील पद भरतीसाठी अर्हता धारक उमेदवारांकडून विहित नमुण्यात फक्त ऑनलाईन पध्दतीनेच https://parbhani.gov.in/ किंवा http://parbhani.applygov.net/ संकेतस्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहेत.

Maharashtra Police Patil Bharti 2024 : पोलीस पाटील भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर जाहिरात https://parbhani.gov.in/ किंवा http://parbhani.applygov.net/ संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी संपुर्ण माहिती काळजीपुर्वक वाचुनच ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदाकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरुन विहित ऑनलाईन पध्दतीनेच भरलेले अर्ज व विहित पध्दतीने भरलेल्या प्रक्रिया शुल्कासह ग्राहय धरण्यात येतील इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेट देवून भरती प्रक्रियेची माहिती बाबत अदयावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहिल.

भरती प्रक्रिया / परिक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, अंशता बदल करणे, पदाच्या एकुण गावनिहाय संख्येमध्ये वाढ किंवा घट तसेच आरक्षणात बदल करण्याचे अधिकार तसेच प्रक्रिये संदर्भात प्राप्त तक्रारीबाबत निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार संबंधीत उपविभागीय दंडाधिकारी तथा अध्यक्ष, पोलीस पाटील निवड समिती यांना राहील.

Maharashtra Police Patil Bharti 2024 : जिल्हाधिकारी कार्यालय परभणी पोलीस पाटील भरती २०२४ जाहीर

✍ पद : पोलीस पाटील भरती २०२४

✍ पदसंख्या : एकूण ३०४ जागा

✍ वेतन श्रेणी : सरकारी नियमानुसार

✔ शैक्षणिक पात्रता : इयत्ता दहावी उत्तीर्ण, स्थानिक व कायम रहिवाशी असावा, निष्कलंक चारित्र्य आवश्यक

➡ वयोमर्यादा : किमान २५ ते कमाल ४५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ८००/- मागासवर्गीय : रु. ७००/-

✈ नोकरीचे ठिकाण : स्थानिक व कायम रहिवाशी गावात व इ.

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २३ जानेवारी २०२४

Police Patil Bharti

Maharashtra Police Patil Bharti 2024 : अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

Stay Connected with सुरेटा नोकरी मदत केंद्र

नवीन योजना, शालेय प्रवेश आणि करिअरच्या संधींबद्दल तात्काळ अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या सोशल मिडियाला लगेच फोलोव करा.

आमच्याशी थेट व्हाटसअपवर कनेक्ट व्हा: https://wa.me/+91[current-user:profile-social-media:field_whatsapp_no_]
इंस्टाग्राम :  https://www.facebook.com/surreta
व्हाटसप ग्रुप : https://mahavle.com/whatsaap-group-link
फेसबुक : https://www.facebook.com/surreta
X (ट्विटर) : https://twitter.com/surretas
मोफत मोबाईल अँप : https://t.co/qgpCmnUUc1

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!