शेतकऱ्यांना मोठा दिलासा | पीकविमा भरण्याच्या तारखेत मुदतवाढ, आता या तारखेपर्यंत शेतकऱ्यांना करता येणार अर्ज...

Pik Vima

Maharashtra Rabbi Pik Vima 2023 : पिक विमा योजनेत आंबा, काजू व संत्रा हि फळपिके आणि रब्बी ज्वारी या पिकांसाठी पिक विमा योजनेत भाग घेण्यास दोन दिवसांची अतिरिक्त (वाढीव) मुदत वाढ देण्याबाबत.

हे सुद्धा वाचा : JEE MAIN परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या तारखेत मुदतवाढ, हि आहे अर्जाची शेवट तारीख...

Maharashtra Rabbi Pik Vima 2023 : महाराष्ट्र राज्यात विमा योजना अंतर्गत २०२३-२४ मध्ये कोकणातील आंबा आणि सर्व राज्यातील काजू, संत्रा व रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ असा होता. मात्र पीक विमा पोर्टल मध्ये काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे काही इच्छुक शेतकरी या पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिले.

हे सुद्धा वाचा : काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय घडले ? जाणून घ्या इथे | काय म्हणाले एकनाथ शिंदे...

Maharashtra Rabbi Pik Vima 2023 : सदर शेतकऱ्यांना विमा योजनेत भाग घेता यावा या दृष्टिकोनातून कोकणातील आंबा पिक, सर्व राज्यातील काजू, संत्रा या फळपिकांसाठी व रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या विनंतीवरून केंद्र शासनाने त्यांचे पत्र दिनांक ०२-१२-२०२३ अन्वये दिनांक ०४ व ०५ डिसेंबर २०२३ अशी दोन दिवसांची अतिरिक्त (वाढीव) मुदत वाढ मंजूर केली आहे.

Maharashtra Rabbi Pik Vima 2023 : पीकविमा भरण्याच्या तारखेत मुदतवाढ...

पिकाचे नाव विमा योजनेत भाग घेण्याचा नियमित अंतिम दिनांक विमा योजनेत भाग घेण्यासाठी वाढीव मुदत
कोकणातील आंबा

३० नोव्हेंबर २०२३

०४ व ०५ डिसेंबर २०२३

काजू
संत्रा
रब्बी ज्वारी

Pik Vima

आता विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिलेले इच्छुक शेतकरी वरील फळ पिकांसाठी ०४ व ०५ डिसेंबर २०२३ रोजी विमा योजनेत सहभागी होऊ शकतात.

हे सुद्धा वाचा : दहावी-बारावीच्या परीक्षेचे TIME TABLE PDF उपलब्ध | पहा कधी सुरु होणार आणि कधी संपणार परीक्षा...

याचा राज्यातील आंबा, काजू, संत्रा व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. कोकण व्यतिरिक्त राज्यातील उर्वरीत भागातील आंबा फळ पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२३ असा नियमित आहे. तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, रब्बी कांदा पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक १५ डिसेंबर २०२३ असा आहे. कृपया याची नोंद घ्यावी.

हे सुद्धा वाचा : IPHONE 14 आणि SAMSUNG GALAXY S23 MRP पेक्षा झाले खूपच स्वस्त | ONEPLUS FOLD वरही मोठी सूट...