महाराष्ट्र दहावी-बारावी परीक्षा २०२४ चे वेळापत्रक उपलब्ध | PDF डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

SSC HSC Exam Time Table 2024

Maharashra SSC HSC Exam Time Table 2024 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र बोर्डाने जाहीर केलेल्या परीक्षा वेळापत्रक 2024 नुसार, महाराष्ट्र SSC परीक्षा 2024 शुक्रवार, 1 मार्च रोजी प्रथम भाषेच्या पेपरने म्हणजेच मराठीच्या पेपरने सुरू होईल.

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता 10 (SSC) आणि इयत्ता 12 (HSC) अंतिम परीक्षा 2024 चे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेतल्या जातील. इयत्ता 12वीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 पासून, तर 10वीच्या परीक्षा 1 मार्च 2024 पासून सुरू होतील. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर जाऊन विद्यार्थी त्यांच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक तपासू आणि डाउनलोड करू शकतात.

SSC HSC Exam Time Table 2024 :

MSBSHSE (Maharashtra Secondary & Higher Secondary Education Board Pune) बोर्डाने जाहीर केलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार, महाराष्ट्र SSC परीक्षा 2024 शुक्रवार, 1 मार्च रोजी प्रथम भाषेच्या पेपरने सुरू होईल. बहुतेक परीक्षा एकाच शिफ्टमध्ये सकाळी 11 वाजता घेतल्या जातील, तर काही पेपर्समध्ये 3 वाजल्यापासून दुसरी शिफ्ट असेल. परीक्षा 22 मार्च रोजी संपणार आहे. शेवटच्या दिवशी सामाजिक शास्त्र पेपर २ आणि भूगोल या विषयांची परीक्षा होणार आहे.

तर Maharashtra HSC Board Exam 2024 हि 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान होणार आहे. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार असून पहिली शिफ्ट सकाळी 11 वाजल्यापासून तर दुसरी शिफ्ट दुपारी 3 वाजल्यापासून घेण्यात येईल. पहिल्या दिवशी विद्यार्थी इंग्रजीचा पेपर देतील, तर शेवटचा पेपर समाजशास्त्राचा असेल.

SSC HSC Exam Time Table 2024

SSC HSC Exam Time Table 2024 PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.