लेक लाडकी योजना मुलींना करणार लखपती; मुलींना मिळणार १ लाख १ हजार रुपये | जाणून घ्या काय आहे पात्रता आणि अटी...

Lek Ladki Yojana

Lek Ladki Yojana | महिला व बालविकास विभागांतर्गत राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणारी लेक लाडकी योजना मुलींना करणार लखपती | 

Maharashtra Lek Ladki Yojana 2023 : राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना | मुलींना करणार लखपती

महाराष्ट्रातील मुलींसाठी एक आनंदाची बातमी आहे. खास मुलींसाठी आणलेल्या 'लेक लाडकी योजने' बद्दल महाराष्ट्र सरकार लवकरच आनंदाची बातमी देऊ शकते. ज्या अंतर्गत मुलींना एक लाख एक हजार रुपये मिळतील. ही रक्कम सहा पटीत मिळेल. या लेखात आम्ही तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती देत ​​आहोत.

वास्तविक, महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी 'लेक लाडकी योजना' (Maharashtra Lek Ladki Yojana 2023) मंजूर केली. याअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना सरकार एक लाख एक हजार रुपये देणार आहे. मार्च 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेची घोषणा करण्यात आली होती.

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय काल १० ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, ११ वीत गेल्यावर ८ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा रितीने एकूण त्या मुलीस १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ मिळेल. या संदर्भात अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. माझी कन्या भाग्यश्री ही योजना अधिक्रमित करून १ एप्रिल २०२३ पासून जन्मणाऱ्या मुलींसाठी ही योजना राबविण्यात येईल.

Lek Ladki Yojana

हे सुद्धा वाचा : महाराष्ट्र तलाठी भरतीच्या निकालाची अंतिम तारीख जाहीर, आणि उमेदवारांना या दिवशी मिळणार जॉईनिंग लेटर...

मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे यासाठी ही योजना राबविण्यात येईल. १ एप्रिल २०२३ नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या १ अथवा २ मुलींना त्याच प्रमाणे १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास १ मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. मात्र आई किंवा वडिलांनी कुटूंबनियोजन शस्त्रक्रीया करणे आवश्यक राहील. १ एप्रिल २०२३ पूर्वी १ मुलगी किंवा मुलगा आणि आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. जुळ्या दोन्ही मुलांना स्वतंत्र लाभ देण्यात येईल. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.