नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता आला ? १७२० कोटी रुपये निधी वितरीत | GR वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

Namo Shetkari Yojana

Maharashtra Namo Shetkari Yojana 2023 : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत पहिल्या हप्त्यापोटी रु. १७२० कोटी इतका निधी वितरीत करण्याबाबत...

हे सुद्धा वाचा : लेक लाडकी योजना मुलींना करणार लखपती; मुलींना मिळणार १ लाख १ हजार रुपये

Maharashtra Namo Shetkari Yojana 2023 : सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली होती. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देण्यात येणा-या प्रति वर्ष प्रति शेतकरी रु.६०००.०० या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी रु.६०००.०० इतक्या निधीची भर घालणारी "नमो शेतकरी महासन्मान निधी" ही योजना राबविण्यास संदर्भ क्र. (१) येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. तसेच सदर योजने अंतर्गत लाभार्थीना लाभ अदा करणेसाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणा-या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती, आयुक्त (कृषि) यांचे नावे बँक ऑफ महाराष्ट्र" या राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्यास संदर्भ क्र. (२) येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, पुणे यांनी संदर्भ क्र. (४) च्या पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत पहिल्या हप्त्यापोटी (माहे एप्रिल ते जुलै) रु. १७२० कोटी इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Maharashtra Namo Shetkari Yojana 2023 शासन निर्णय :-

  • नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत पहिल्या हप्त्यापोटी (माहे एप्रिल ते जुलै) रु. १७२०.०० कोटी इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
  • प्रस्तुत खर्च पुढील लेखाशिर्षाखाली सन २०२३-२४ करिता पुरक मागणीद्वारे मंजूर केलेल्या तरतूदीतून भागविण्यात यावा -
    • २४०१ पीक संवर्धन
    • ११५, लहान / सीमान्त शेतक-यांची आणि शेतमजुरांची योजना
    • नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (१००% राज्य योजना कार्यक्रम)
  • सदर शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात येणारा निधी संदर्भ क्र. (१) च्या शासन निर्णयात नमूद तरतूदीनुसार खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त (कृषि) यांची राहील.
  • उपरोक्त प्रमाणे उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या निधीच्या विनियोगाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र आयुक्त (कृषि) शासनास सादर करतील.
  • प्रस्तुत योजनेच्या प्रयोजनार्थ आयुक्तालय स्तरावर आयुक्त (कृषि) यांना नियंत्रण अधिकारी व सहाय्यक संचालक, लेखा १, यांना आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्यात येत आहे.

Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana GR वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.